28 September 2020 8:27 PM
अँप डाउनलोड

प. बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली आलीच पाहिजे; ममता बॅनर्जींचा 'राज'बाणा

Mamta banerjee, Amit Shah, Narendra Modi

कोलकाता : डॉक्टरांच्या संपामुळे घेरल्या गेलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढविताना बंगाली भाषा आणि बंगाली अस्मिता कार्ड उघडले आहे. बाहेरच्या लोकांवरून भारतीय जनता पक्षावर नेम धरत, त्यांनी जर आमच्या राज्यात राहायचे असेल तर आमची बंगाली भाषा बोलता आलीच पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. तसेच अशा गुन्हेगारांना राज्यात जरा देखील थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर फिरतात, असे देखील ममता म्हणाल्या.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मागील काही दिवसांपासून कोलकातामध्ये डॉक्टरांचा संप सुरु आहे. डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभुमीवर देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यावरून ममता बॅनर्जी विरोधकांच्या लक्ष्य झाल्या आहेत. यामुळे ममता यांनी थेट भाषिक मुद्दा उपस्थित करत बंगालला गुजरात बनू देणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

उत्तर परगना जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करताना ममता यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. आपल्याला बंगाली भाषेला पुढे आणले पाहिजे. जेव्हा मी बिहार, युपी किंवा पंजाबमध्ये जाते तेव्हा तेथील भाषा बोलते. जर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये राहत असाल तर तुम्हाला बंगाली भाषा आलीच पाहिजे. अशा गुन्हेगारांना राज्यात थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर इकडे तिकडे फिरतात, असे ममता म्हणाला.

डॉक्टरांना भारतीय जनता पक्ष आणि माक्सवादी कम्युनिस्ट पक्ष भडकवत असून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचे काम ते करत आहे, असा आरोप ममता यांनी केला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी यावर प्रतिक्रिया देताना ममता या आरोग्य मंत्री आहेत. त्यांच्या अहंकारमुळे मागील ४ दिवसांत किती जणांनी मृत्यूच्या दारात जाण्याचा अनुभव घेतला असेल, काही तरी लाज बाळगा, असे ट्विट केले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(240)#MamtaBanerjee(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x