19 July 2019 9:38 AM
अँप डाउनलोड

धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

नवी दिल्ली : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून २ दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील हाय कोर्टाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आज पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याला देखील स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच धनंजय मुंडे यांना गजाआड टाकण्याची सत्ताधारी पक्षांची खेळी फासल्याची चर्चा रंगली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे नियोजित जगमित्र शुगर मिलसाठी चुकीच्या पद्धतीने कृषक जमीन अकृषक बनवून खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर जमीन ही बेलवंडी देवस्थानची असल्याचा दावा याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांच्याकडून करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद हायकोर्टाने धनंजय मुंडे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी या प्रकरणावर आज सुनावणी होणार असताना पोलिसांनी आज पहाटेच बर्दापूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली.

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणण्याचा सरकारचा हा डाव असल्याची चर्चा होती. मात्र धनंजय मुंडे यांना न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे ते पुन्हा एकदा अधिवेशनात आक्रमकपणे सरकारवर जनतेच्या प्रश्नासाठी तुटून पडतील, अशा भावना व्यक्त केल्या जात आहे. धनंजय मुंडे विधानपरिषदेतील फक्त एनसीपीचे नेते नसून ते काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, माकप या पक्षांचेही नेते आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे धनंजय मुंडे यांनी स्वागत केले असून सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(12)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या