21 October 2019 4:34 PM
अँप डाउनलोड

१०० मतं कमी असताना भाजपचा उमेदवार ७४ मतांनी विजय ? 'लक्ष्मीदर्शना'ची चर्चा रंगली

बीड : लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीच्या निकालात भाजप उमेदवार सुरेश धस यांनी बाजी मारली असून ते तब्बल ७४ मतांनी विजयी झाले आहेत. परंतु हा विजय म्हणजे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना दिलेला जोरदार झटका समजला जात आहे.

भाजपच्या लक्ष्मीदर्शनाने हे शक्य झाल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. कारण १०० मतांनी मागे असलेला भाजपचा उमेदवार ७४ मतांनी कसा काय विजय होऊ शकतो अशी कुजबुज सुरु झाली आहे. परंतु त्यामुळे पंकजा मुंडेंची राजकीय ताकद पुन्हा अजून एकदा सिद्ध झाली आहे.

एकूण १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यातील ५२७ मत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडे होती. परंतु भाजकडे तब्बल १०० मत कमी असताना सुद्धा विजय झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण भाजपचे उमेदवार सुरेश धस हे मतमोजणीत सुरुवाती पासूनच आघाडीवर होते ते शेवटपर्यंत आघाडीवर राहिले आणि त्यांनी तब्बल ५२६ मतं घेतली तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना ४५१ मतांवर समाधानी रहावे लागले. तर एकूण २५ मतं तांत्रिक कारणामुळे बाद ठरविण्यात आली तर एकाने नोटासाठी मतदान केले.

यावरून असा अंदाज राजकीय विश्लेषक नोंदवत आहेत की, लक्ष्मीदर्शनाने काँग्रेस-राष्ट्रवादीची बरीच मते फुटली असावीत त्यामुळे हा विजय भाजपने खेचून नेला आहे असं म्हटलं जात आहे.

हॅशटॅग्स

BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या