23 September 2021 2:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

ED, CBI मार्फत दिलेला त्रास भाजपला भोगावा लागेल | मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

Minister Jayant Patil

कोल्हापूर, ०९ सप्टेंबर | राज्यातील अनेक नेत्यांना ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पार्टीने उद्योग सुरू केला. तुरुंगवासाच्या भीतीने अनेक जण भारतीय जनता पार्टीत गेले. परंतु, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे त्याला अपवाद ठरले. आरोप करणाऱ्यांनी यातून धडा घेतला पाहिजे. मात्र, भारतीय जनता पार्टीने दिलेला त्रास हा भाजपाला सहन करावा लागेल, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. न्यायालयाने छगन भुजबळ यांना क्लीनचिट दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया कोल्हापुरात दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ED, CBI मार्फत दिलेला त्रास भाजपला भोगावा लागेल, मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया – BJP will have to bear the pain of ED CBI said minister Jayant Patil in Kolhapur :

छगन भुजबळ त्याला अपवाद:
आम्ही अनेक दिवस सांगत आलो आहे, छगन भुजबळ यांच्यावरील आरोप खोटे आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले. मूळ आरोप ठेवत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले. मात्र, आता न्यायालयाने दिलेले क्लीनचिट ही समाधानाची बाब आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, केवळ छगन भुजबळ यांच्यावरच असे गुन्हे दाखल केले नाहीत. तर राज्यातील अनेक वेगवेगळ्या प्रकरणात अनेक नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.

जाणीवपूर्वक ईडी आणि सीबीआय आणून भाजपा हा उद्योग करत आहे. मात्र, राज्यातील जनतेने छगन भुजबळ यांना साथ दिली. छगन भुजबळ हे धीराने या सर्व गोष्टीला सामोरे गेले. अनेक जण तुरुंगवासाच्या भीतीने सत्तेत गेले. पण छगन भुजबळ त्यांना अपवाद ठरले, अशी प्रतिक्रियाही जयंत पाटील यांनी दिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP will have to bear the pain of ED CBI said minister Jayant Patil in Kolhapur.

हॅशटॅग्स

#JayantPatil(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x