12 December 2024 8:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Thackeray Govt For Maharashtra Police | राज्यातील पोलिसांना दसऱ्याच्या मुहुर्तादिनी ठाकरे सरकारची मोठी भेट

Thackeray Govt For Maharashtra Police

मुंबई, १५ ऑक्टोबर | आजच्या शुभ दिनी ठाकरे सरकारने महाराष्ट्र पोलिसांच्या संदर्भात महत्वाचा आणि आनंददायी निर्णय घेतला आहे. आजच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने पोलिसांच्या पदोन्नतीसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय (Thackeray Govt For Maharashtra Police) घेतला आहे. सदर निर्णायामुळे पोलीस दलातील जवळपास 45 हजार पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना थेट मोठा फायदा होणार आहे.

Thackeray Govt For Maharashtra Police. Today, on the eve of Dussehra, the Thackeray government has taken a very important decision regarding the promotion of the police. The decision will directly benefit about 45,000 police constables, assistant police inspectors and sub-inspectors in the police force :

विशेष म्हणजे पोलीस शिपायांना पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त होण्याची संधी मिळणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर घेण्यात आलेल्या पदोन्नतीच्या या निर्णयामुळे पोलीस दलात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.

नेमका निर्णय काय?
ठाकरे सरकारने पदोन्नती संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे अंमलदारास कमी कालावधीत अधिकारी पदावरुन निवृत्त होता येईल. या नव्या निर्णयामुळे अधिकारी दर्जाच्या पोलिसांची संख्या वाढेल. तसेच पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशा तपासी अंमलदारांच्या संख्येमध्येही वाढ होईल. या निर्णयामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरिकांची मदत घेण्यात अधिक सुलभता येऊन पोलीस दलाचे मनोबल वाढेल. यामुळे गुन्हे उघडकीस येण्याच्या व रोखण्याच्या प्रमाणामध्ये निश्चितच भरीव वाढ होईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रशासनाने नमूद केले आहे.

तत्पूर्वी पोलीस शिपायांना आपल्या सेवाकाळात बारा ते पंधरा वर्षानंतर पदोन्नती मिळायची. पदोन्नतीसाठी एवढा जास्त कालावधी लागत असल्यामुळे पोलिसांमध्ये काहीशी नाराजी आणि कामात निरुत्साह दिसायचा. परंतु, या नव्या निर्णयामुळे पोलिसांत नवी उमेद मिळेल आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील याचा प्रचंड आनंद होईल असं राज्य सरकारमधील प्रतिनिधींनी म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Thackeray Govt For Maharashtra Police has taken a decision regarding the promotion of the police.

हॅशटॅग्स

#MaharashtraPolice(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x