27 April 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सोमैयांच्या मागणीप्रमाणे राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय झालं? | आ. वैभव नाईक यांचा सवाल

MLA Vaibhav Naik

सिंधुदुर्ग, ०३ सप्टेंबर | मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांना गुंतवण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे ब्लॅकमेलिंग करत आहेत. यापूर्वी खासदार नारायण राणे यांच्यावरील ईडी चौकशीचे काय झाले? असा सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विचारला आहे.

सोमैयांच्या मागणीप्रमाणे राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय झालं?, आ. वैभव नाईक यांचा सवाल – Why Narayan Rane’s ED investigation in on hold said Shivsena MLA Vaibhav Naik :

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावर नाईक म्हणाले, शिवसेना पक्ष आणि नेत्यांवर तोंडसुख घेण्यासाठी किरीट सोमय्या पुढे आले आहे. अनिल परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. वडिलोपार्जित घराची त्यांनी दुरुस्ती त्यांनी केली असून सिंधुदुर्गात त्यांची या व्यतिरिक्त एकही मालमत्ता नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये अनिल परब यांचे मोठे नाव आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अनिल परब यांच्यावर बेछूट आरोप करण्याचा प्रकार सोमय्या यांच्याकडून होत आहे.

राणेंच्या 53 कोटीच्या मालमत्तेची चौकशी:
कुडाळ येथील एसटी डेपोचे काम २ कोटीचे होते. इंजिनियर कंपनीने हे काम केले, ते कोणाच्या जवळचे आहेत हे सर्वश्रुत आहे. जर २ कोटीच्या कामाच अडीच कोटीचा घोटाळा कसा झाला ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. नारायण राणे यांच्या 53 कोटीच्या बेनामी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यापूर्वी केली. नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाले कुठून? यात कोणाचा सहभाग आहे, याची चौकशी का थांबली ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. किरीट सोमय्या जर यापुढे मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर असे बेछूट आरोप करत राहिले तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही इशारा नाईक यांनी यावेळी दिला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Why Narayan Rane’s ED investigation in on hold said Shivsena MLA Vaibhav Naik.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x