12 August 2022 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Syrma SGS Technology IPO | सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला, गुंतवणुकीची मोठी संधी Multibagger Stocks | या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले करोडपती, 2 रुपयांच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 16 कोटी केले Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांनी खरेदी केलेला हा स्टॉक रॉकेट सारखा वाढतोय, बाजार तज्ञांचा खरेदी करण्याचा सल्ला GST on Rented Home | आता भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना भरावा लागणार 18% GST, मोदी सरकारचे नवे नियम लक्षात ठेवा Multibagger Penny Stocks | 17 रुपयाच्या शेअरने 11,225 टक्के परतावा दिला, अजून 50 परतावा देऊ शकतो, गुंतवणुकीची सुवर्ण संधी LIC Credit Card | पॉलिसीधारकांनो, आता तुम्हाला घरबसल्या फ्री LIC क्रेडिट कार्ड मिळेल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स Stocks To Buy | म्युच्युअल फंडांनी केली या कंपनीत गुंतवणूक, 39.70 लाख शेअर्स खरेदी केले, या शेअरमध्ये गुंतवणुकीचा विचार करा
x

दिशा सालियनची आत्महत्या की खून झाला | मैत्रिणीने सांगितलं नेमकं काय घडलं त्यादिवशी

Bollywood actor Sushant Singh Rajput, Disha Salian, ED, CBI

मुंबई, ८ ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. “सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा,” असे नारायण राणे म्हणाले होते. “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय,” असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला होता.

“सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? 13 तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेऱ्यात त्यांचा ताफा वगैरे ते येणार नाहीत. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नाही,” असेही नारायण राणे म्हणाले होते.

रिया चक्रवर्ती ही सुशांतची मैत्रिण, त्याच्यासोबत राहायची. ती 9 तारखेला त्याला सोडून गेली. या प्रकरणातील प्रमुख व्यक्ती तीन-चार दिवसांपासून गायब झाली आहे. पोलिसांना याबाबत माहिती नाही. मुंबई पोलीस अज्ञात असतील, असं मला वाटत नाही. मंत्री असो किंवा कुणीही असो, निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही. रिया चक्रवर्तीला शोधून तिच्याकडून अधिकची माहिती घेणं आवश्यक आहे. सुशांतच्या केसमध्ये जे लोक वाचवायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी गप्प बसावं. नाहीतर त्यांच्याही कुंडल्या बाहेर काढल्या जातील, असे नारायणा राणेंनी सांगितले.

दरम्यान, असा रिपोर्ट आहे की, दिशाने इमारतीच्या १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पण त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितलं आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या एका वृत्तानुसार, दिशा सालियनच्या एका मैत्रिणीने घटनेच्या दिवसाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. घटनेच्या दिवशी दिशाच्या घरी तिचा होणारा पती रोहन, हिमांशु आणि कॉलेजमधील मित्र नील व दीप हे होते. सगळेच पार्टी करत होते आणि ड्रिंकही करत होते. पण ड्रिंक केल्यानंतर दिशा फार इमोशनल झाली होती. ती पुन्हा पुन्हा बोलत होती की, कुणालाही तिची काळजी नाही. यावरून शंका निर्माण होऊ शकते. पण दिशाच्या मैत्रिणीने सांगितले की, ड्रिंक घेतल्यावर ती नेहमीच अशा प्रकारे बोलत होती.

दिशाच्या मैत्रिणीनुसार, घरात पार्टी सुरू होती. पण दिशा रात्री ८ वाजता एका दुसऱ्या मित्रासोबत लॉकडाऊननंतर काय करायचं यावर चर्चा करत होती. त्यानंतर दिशाने यूकेतील मित्राला फोन केला. फोनवर ती रडू लागली होती. त्यामुळे हिमांशु थोडा नाराज झाला. त्याने तिला रडण्यास मनाई केली कारण पार्टीचा मूड खराब होत होता.

त्यानंतर दिशा तिच्या रूममध्ये गेली आणि तिने दरवाजा आतून बंद करून घेतला. बराचवेळ दिशाने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दरवाजा तोडला. रूममध्ये दिशा नव्हती. पण जेव्हा हिमांशु आणि दीपने खाली पाहिलं तर ते हैराण झाले. सगळेच खाली धावत गेले. पण तोपर्यत उशीर झाला होता.

 

News English Summary: A friend of Disha Salian has given details about the day of the incident. Her husband Rohan, Himanshu and college friends Neil and Deep were at Disha’s house on the day of the incident.

News English Title: Bollywood actor Sushant Singh Rajput Manager Disha Salian friend reveal whole story death News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x