27 September 2023 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ganesh Pandal Fire | पुण्यात गणेश मंडपाला आग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बावनकुळे देखील मंडपात उपस्थित होते GTL Infra Vs Sonu Infra Share | जीटीएल इन्फ्राला ऑर्डर मिळेना, पण सोनू इन्फ्राटेक कंपनीला रिलायन्ससह अनेक ऑर्डर्स, स्वस्त शेअर सुसाट तेजीत Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार? Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय? Tata Power Share Price | पॉवर सेक्टर स्टॉकमध्ये जोरदार तेजी, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा पॉवर शेअरला होणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 27 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या
x

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं भांडवल करु नये | राऊतांनी विरोधकांना सुनावलं

Shivsena, MP Sanjay Raut, Mansukh Hiren case

मुंबई, ०६ मार्च: उद्योपगती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांचा साठा असलेलं वाहन सापडल्याप्रकरणी तपास सुरु असतानाच वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीजवळ आढळून आल्याने गूढ आणखी वाढलं आहे. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस सांगत असताना दुसरीकडे कुटुंबीय मात्र हा दावा फेटाळत आहेत. या दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (६ मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Shivsena MP Sanjay Raut talked with media over Mansukh Hiren case)

जर उपस्थित केलेले प्रश्न योग्य, मुद्देसूल असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. त्यांच्या मृत्यूचं भांडवल करु नये. कारण ती निरपराध व्यक्त्ती आहे. त्यांचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे? त्याला कोण जबाबदार आहे? या सगळ्या गोष्टींबाबतचं सत्य जितक्या लवकर गृहखातं समोर आणेल तितकं हे या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल,” असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हिरेन यांचा मृत्यू का झाला? कोणत्या कारणाने झाला? त्याला कोण जबाबदार आहेत? या सर्व प्रश्नांशी संबंधित सत्य लवकरात लवकर बाहेर यायला हवं. जेवढ्या लवकर सत्य बाहेर येईल तेवढं सरकारच्या प्रतिष्ठा आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल. वाझेंचं मला माहीत नाही. मला असं वाटतं एखाद्या अधिकाऱ्यावर बोलणं योग्य वाटत नाही, असं राऊत प्रतिक्रिया देताना म्हणाले.

 

News English Summary: The body of Mansukh Hiren, the owner of the vehicle, was found near Mumbra Bay while an investigation was underway into the discovery of a vehicle with explosives outside the house of industrialist Mukesh Ambani. While the police say that Mansukh Hiren has committed suicide, the family members are denying this claim. Meanwhile, Shiv Sena MP Sanjay Raut has given his first reaction. He was speaking to the media today (March 6).

News English Title: Shivsena MP Sanjay Raut talked with media over Mansukh Hiren case news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x