15 May 2021 2:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

Maratha Reservation | ७ मार्चला मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा

Mumbai Coordinator, Maratha Kranti Morcha, Virendra Pawar, Akrosh Morcha

जालना, ०६ मार्च: महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत ८ मार्चला सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी होण्याआधी मराठा क्रांती मोर्चाला आपल्या काही भूमिका स्पष्ट करायच्या होत्या. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जालना येथील साष्ठ पिंपळ गाव इथं ७ मार्चला मोठ्या आक्रोश सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा मोर्चाकडून देण्यात आली आहे. ‘या आक्रोश सभेसाठी राज्यभरातील मराठा समाजातील लोकांनी एकत्र यावे, मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार हे सर्वोच्च न्यायालयाचे कारण पुढे देत असले तरी मागील ३ वर्षात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याबाबत काहीच केले गेले नाही, शिवस्मारक बाबत काही केले गेले नाही. या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार किंवा सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही,’ अशी रोखठोक भूमिका मराठा क्रांती मोर्चाकडून मांडण्यात आली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरण हे ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी करत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी येत्या 8 मार्च या दिवशी होणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने कोर्टात हा अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे होणार आहे. सध्या हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे आहे.

 

News English Summary: The issue of Maratha reservation is currently being raised in Maharashtra. The Supreme Court will hear the Maratha reservation on March 8. Before the hearing on the Maratha reservation petition, the Maratha Kranti Morcha wanted to clarify some of its roles. Against this backdrop, a press conference was held on behalf of Maratha Kranti Morcha. While addressing this press conference, Mumbai Coordinator of Maratha Kranti Morcha Virendra Pawar has made a big announcement.

News English Title: Mumbai Coordinator of Maratha Kranti Morcha Virendra Pawar has made a announcement over Akrosh Morcha news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x