11 December 2024 8:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

मेधा कुलकर्णीं यांचा राजकीय प्रवास संपुष्टात? | चंद्रकांत पाटलांवर अजून विश्वास?

BJP former MLA Medha Kulkarni, Chandrakant Patil

पुणे, ९ नोव्हेंबर: विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांचा पुन्हा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरवरून येऊन चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट केला होता. त्यानंतर त्यांना अपेक्षांवर ठेवून वर्षभर झुलवत ठेवलं आणि आयत्यावेळी म्हणजे पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुन्हा सांगलीवरून उमेदवार आयात करून मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करून एकप्रकारे त्यांचं राजकीय प्रवासचं संपुष्टात आणला आहे.

संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील एकाधिकारशाही राबवत असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरु झाली आहे. ज्यांनी एकनाथ खडसे आणि इतर वरिष्ठ नेत्यांना जुमानलं नाही ते मेधा कुलकर्णी यांच्या पुढे झुकतील किंवा नमतं घेतील याची शक्यता जवळपास नगण्य असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात. तत्पूर्वी मेधा कुलकर्णी पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा माध्यमांवर सुरु होताच, स्वतः मेधा कुलकर्णी यांनी तो दावा धुडकावत मला विधान परिषदेला उमेदवारी मिळेल या अपेक्षेने भाजपाची बाजू सावरली होती. मात्र त्यानंतर देखील त्यांच्या विश्वासघात झाला हे सध्याचं राजकारण सांगतं.

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली होती. त्यामुळे ही जागा जिंकणे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.संग्राम देशमुख यांना उमेदवारी मिळाल्याने पुणे पदवीधरसाठी चुरशीची लढत होणार आहे.संग्राम देशमुख हे सांगली जिल्ह्यातील मोठे प्रस्थ आहे.साखरकारखाने,सुतगिरणी आणि शिक्षणसंस्था असा त्यांचा कार्यभार मोठा आहे .ते सध्या जिल्हापरिषदेचे अध्यक्षही आहेत.त्यामुळे पुणे पदवीधरच्या निवडणुकीत भाजपकडून संग्राम देशमुख हे चंद्रकांत पाटील यांचा वारसा चालवणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

News English Summary: Chandrakant Patil, who came from Kolhapur in the Assembly elections, had cut the address of the then MLA Medha Kulkarni. After that, he was kept in suspense for a year by keeping them on expectations and in the coming elections, in the graduate constituency elections, by importing candidates from Sangli again, Medha Kulkarni’s address has been cut off and in a way, her political journey has come to an end.

News English Title: BJP Pune former MLA Medha Kulkarni political carrier in danger news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x