2 July 2020 10:56 AM
अँप डाउनलोड

भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींवर पुण्यात हल्ला

BJP Medha Kulkarni, Drunk Youth Attack

पुणे, ७ जून: भारतीय जनता पार्टीच्या कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कोथरुडमधील सहजानंद सोसायटी भागात दारु पित बसलेल्या तरुणांना जाब विचारणाऱ्या दोघा व्यक्तींवर पहिले हल्ला करण्यात आला. याच परिसरात राहत असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळावर जाऊन काय झालं म्हणून विचारणा केल्यानंतर त्यांच्यावरही दारु पिणाऱ्या तरुणांनी हल्ला केला.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. एका महिलेनं या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, काही तरुण शनिवारी संध्याकाळी सहजानंद सोसायटीच्या बाहेर दारू पीत बसले होते. तक्रारदार महिलेचे सासरे तिथूनच कुत्र्याला घेऊन फेरफटका मारत होते. नशेत असलेल्या या तरुणांनी त्या गृहस्थाला हटकले आणि कुत्रा अंगावर सोडतो काय, असं म्हणून बाचाबाची सुरू केली. त्यामुळं घाबरून संबंधित गृहस्थ तिथून निघाले. मात्र या तरुणांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना बाटली फेकून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेला आरडाओरडा ऐकून दोन तरुण धावत आले. पण त्यांनाही चौघांनी दारूड्या तरुणांनी मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी तक्रारदार महिला पुढं आली असता तिला ढकलून देण्यात आलं.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे सासरे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता कुत्र्याच्या घेऊन बाहेर फिरायला जात होते. त्यावेळी सहजानंद सोसायटीच्या बाहेर जवळच्या सोसायटीतील अमर बनसोडे, विनोद गंदे व त्यांचे दोन मित्र हे तेथे दारू पित थांबले होते. त्यांच्या अंगावर कुत्रा भुंकल्याने त्यांनी कुत्रा अंगावर सोडतो काय या कारणावरुन त्यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी हे चौघे चारचाकी गाडीतून त्यांच्या मागोमाग आले. त्यांनी शिवीगाळ करुन त्यांना मारण्यासाठी काचेची बाटली व दगड फेकून मारला. त्यामुळे फिर्यादीचे सासरे हे घाबरुन जोरात आरडाओरडा करीत सोसायटीत पळाले. त्यांचा आवाज ऐकून राहुल कोल्हे, विलास कोल्हे हे त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही या चौघांनी मारहाण केली. तेव्हा त्यांना सोडविण्यासाठी फिर्यादी तेथे आल्या. तेव्हा त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांच्या दंडाला धरुन ढकलून दिले.

 

News English Summary: Former BJP MLA from Kothrud Medha Kulkarni has been attacked in Pune. The first attack took place in Sahajanand Society area of Kothrud on two persons who were asking for answers from drunken youths.

News English Title: Drunk Youth Attack Former Bjp Mla Medha Kulkarni In Kothrud Area Of Pune News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(457)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x