गुहागर : निसर्गरम्य कोकणात सध्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु, त्याचवेळी पर्यटकांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने अनेक राज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांच्या भेटीला स्वतः डॉल्फिन्स सुद्धा आले आहेत.
कोकणातील नयनरम्य निसर्गासह समुद्रात डॉल्फिन दिसणे ही पर्यटकांसाठी एक परवणीच आहे. कारण, कोकणातील पालेशत किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात डॉल्फिन अवतरले आहेत. दोनशे पेक्षा अधिक कळपाने पोहणाऱ्या डॉल्फिन माशांना पाहण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
निळाशार पाण्यात मोठे डॉल्फिन पोहताना बघाण्यासाठी वेगळी मज्जा असल्याचे पर्यटकांनी सांगितले आहे. गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्र किनाऱ्यावर पोहणारे डॉल्फिनचे विलोभनीय दृश्ये पर्यटकांसाठी आनंददायी ठरले आहे. त्यामुळे या बातमीने सुट्टीचा सीजन असल्यामुळे मोठ्याप्रमानावर डॉल्फिन्स पाहण्यासाठी पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे.
