15 March 2025 4:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 16 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी रविवारचा दिवस, तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 16 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | स्वस्तात खरेदी करा डिफेन्स कंपनीचा शेअर, तज्ज्ञांचा सल्ला, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL Suzlon Share Price | मल्टिबॅगर एनर्जी स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईससह BUY रेटिंग जाहीर - NSE: SUZLON Bonus Share News l खुशखबर, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, पोर्टफोलिओ मजबूत करा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: TATAMOTORS IRB Infra Share Price | शेअर प्राईस 42 रुपये, शेअरमध्ये 56% अपसाईड तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: IRB
x

Sharika Enterprises Share Price | फक्त 9 रुपयांचा पेनी शेअर रोज 20 टक्क्यांनी वाढून अप्पर सर्किट हिट करतोय, फायदा घेणार का?

Sharika Enterprises Share Price

Sharika Enterprises Share Price | शेअर बाजारात स्वस्तात मिळणाऱ्या शेअरला पेनी स्टॉक्स म्हणतात. अनेक गुंतवणुकदार या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून मजबूत फायदा कमावतात. आज या लेखात आपण अशाच एका पेनी स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, त्याचे नाव आहे, ‘शारिका एंटरप्रायझेस’.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटसह 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के अप्पर सर्किटसह 9.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉक वाढीचे कारण :
‘शारिका एंटरप्रायझेस’ कंपनीच्या स्टॉकमध्ये अचानक झालेली ही वाढ एलएस केबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून प्राप्त झालेल्या ऑर्डरमुळे पाहायला मिळत आहे. ‘शारिका एंटरप्रायझेस’ कंपनीला या ऑर्डर अंतर्गत 2000 किलोमीटरसाठी 48 फायबर पुरवठा करायचा आहे. या ऑर्डरचे मूल्य 24.69 कोटी रुपये असून काम पूर्ण करण्याचा कालावधी सहा महिने आहे.

स्टॉक परफॉर्मन्स आणि परतावा :
शारिका एंटरप्रायझेस कंपनीच्या स्टॉकने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. तर मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये 40 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. त्याचप्रमाणे मागील एका वर्षाच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 21.01 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

मागील सहा महिन्यात ‘शारिका एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 23.81 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 69.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘शारिका एंटरप्रायझेस’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 28.15 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठ्वड्यांची नीचांक पातळी किंमत 4.21 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 14.80 रुपये होती.

शारिका एंटरप्रायझेस ही कंपनी मुख्यतः वीज निर्मिती पारेषण आणि वितरण क्षेत्रात अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनी सौर ऊर्जा संयंत्रे डिझाइन आणि स्थापित करण्याचे काम देखील करते. डिसेंबर 2022 मध्ये म्हणजेच तिसऱ्या तिमाहीत या ‘शारिका एंटरप्रायझेस’ कंपनीने 17.86 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. वार्षिक आधारावर कंपनीची निव्वळ विक्री 91.22 टक्के वाढीसह 17.86 कोटी रुपयेवर पोहोचली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sharika Enterprises Share Price today on 16 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Sharika Enterprises Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x