लाहोर : भारतात लवकरच लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात ५ राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा आणि मोदींचा पराभव झाल्याने मोदी पुन्हा भारतीय लष्कराचं भावनिक हत्यार उपसण्याची शक्यता पाकिस्तान सरकारला वाटू लागली आहे. कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या सीमेवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइकचा आदेश देतील आणि त्याचा निवडणुकीत फायदा करून घेतील अशी शक्यता त्यांना वाटू लागली आहे.

पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे सहकारी असलेले शेख रशिद यांनी लाहोरमधील आयोजित कार्यक्रमात ही शक्यता दर्शविली. त्यावेळी ते म्हणाले की, ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींचा पराभव झाला आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकित कट्टर उजव्या विचारसरणीच्या मतदाराला खुष करून, त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा सर्जिकल स्ट्राइकचा वापर करतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांचं संबंधित विधान म्हणजे पाकिस्तानकडून अद्यापसुद्धा दहशतवादी कारवाया सुरू असल्याचं निर्दशनास येते आहे. त्यामुळे भारताच्या सीमा सुरक्षीत ठेवण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. यादी उरी हल्ल्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यानंतर भाजपने स्वतःच्या पक्षाचा उदोउदो करण्यासाठी लष्कराचा वापर केल्याची अनेक उदाहरणं आहेत.

before 2019 lok-sabha polls in india pm narendra modi govt can carry out another surgical strike says pakistan minister