11 December 2024 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

२९४ जागा लांबच | भाजपने प. बंगालमध्ये केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात

First win 30 seats, West Bengal, CM Mamta Banerjee

बीरभूम, २९ डिसेंबर: सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) एकमेकांविरोधात टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या रणधुमाळीत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीरभूम येथे निवडणुकीचे बिगूल वाजवले असून, भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या ममता बॅनर्जी यांनी बीरभूम येथे पदयात्रा काढली. या पदयात्रेत हजारो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर उपस्थितांना केलेल्या संबोधनात पश्चिम बंगालमध्ये भाजपने केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात आणि त्यानंतर २९४ जागांचे स्वप्न पाहावे, असे आव्हान ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिले.

दरम्यान, पुढील वर्षी म्हणजे एप्रिल-मे 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधीच आतापासूनच फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमधील एकूण 294 पैकी तब्बल 200 जागा जिंकण्याचा निर्धार अमित शाहांनी केला होता. एकीकडे बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर, त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने शेजारील पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस 219 जागांसह सत्तेत आहे. बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148 इतका आहे. 2021 मध्ये इथे विधानसभा निवडणुका होत आहेत.

 

News English Summary: Trinamool Congress president Mamata Banerjee marched on Birbhum. Thousands of activists and citizens took part in the march. In her address to the audience, Mamata Banerjee said that BJP should win only 30 seats in West Bengal and then dream of 294 seats.

News English Title: BJP should win only 30 seats in West Bengal and then dream of 294 seats said CM Mamta Banerjee news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x