देशातील महान आमदार | घाटकोपर स्थित बंगालींना घेऊन प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी
मुंबई, ११ डिसेंबर: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. याबाबत बोलताना प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच ‘आगीशी खेळू नका’, असा सल्लादेखील त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना दिला आहे.
राज्यपाल धनखड म्हणाले की, “ममता बॅनर्जी यांनी भारतीय संविधान, कायदा आणि सूव्यवस्था तसेच बंगालच्या संस्कृतीचं पालन करायला हवं. मी या देशाच्या संविधानाची शपथ घेतली आहे, त्याचप्रमाणे तुम्हीदेखील (ममता) शपथ घेतली आहे. आपण दोघेही संविधानाचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत, जर तुम्ही तुमचं कर्तव्य विसरत असाल, तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून दूर गेलात तर तिथून माझी जबाबदारी सुरू होते”.
याचपार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सुरक्षा करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी यासाठी आम्ही राज्यपालांच्या भेटीला चाललो आहोत. आमची मागणी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवावी, असं राम कदम यांनी ट्विट करत म्हटलं होतं. यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यावेळी राम कदम यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील मुंबईत राहणारे काही नागरिकही उपस्थित होते.
हम निकले बंगाली citizens of india के लोगों के साथ काले झेंडे लेकर राजभवन राजपाल भगत सिंग कोश्यारीजी से मिलने. सभी बंगाली लोगों की मांग बंगाल में लोकतंत्र की रक्षा के लिए वहां पर राष्ट्रपति कानून लगाया जाए. यह हमारी बात वे राष्ट्रपतिजी तक पहुंचाये #MamataKillsDemocracy
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) December 11, 2020
News English Summary: Bharatiya Janata Party MLA Ram Kadam has called on Governor Bhagat Singh Koshyari and demanded the imposition of presidential rule in West Bengal. We are on a visit to the Governor to seek the imposition of presidential rule to safeguard democracy in West Bengal. Our demand should be conveyed to the President, Ram Kadam had tweeted. He later called on the Governor and demanded the imposition of presidential rule in West Bengal. Along with Ram Kadam, some residents of Mumbai in West Bengal were also present on the occasion.
News English Title: BJP MLA Ram Kadam has demanded imposition presidential rule in West Bengal News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News