2 May 2024 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

अमित शहा प. बंगालमध्ये आले | पण बिरसा मुंडांऐवजी दुसऱ्याच प्रतिमेला पुष्पहार घातला

Union Home Minister Amit Shah, Garlands wrong statue, TMC calls outsider

प. बंगाल, ७ नोव्हेंबर: मोदी सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah on West Bengal Tour) गुरुवारी बंगालच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आदिवासी बहुल बांकुरा येथे भेट दिली आणि स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. त्यादरम्यान त्यांनी बिरसा मुंडा यांच्याऐवजी दुसऱ्याच प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अमित शकांनी केलेल्या या चुकीने पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने शहांवर तिखट शद्बात टीकास्त्र सोडलं आहे. शहांविरोधात संताप व्यक्त करताना त्यांचा उल्लेख थेट ‘बाहेरचे’ असा केला आहे.

स्वतः अमित शहा यांनी ट्विट केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आणि विरोधकांनी त्यांना लक्ष केलं. शाह यांनी संबंधित कार्यक्रमाचे फोटो ट्वीट करुन लिहिले की, “आज पश्चिम बंगालच्या बांकुरा येथे प्रसिद्ध आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांना पुष्पांजली अर्पण केली. बिरसा मुंडा यांचं जीवन आपल्या आदिवासी बहिण आणि भावांचे अधिकार आणि उत्कर्षासाठी समर्पित होता. त्यांच धाडस, संघर्ष आणि बलिदान आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहिल.”

दरम्यान, ही घटना ऐकल्यानंतर पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसलाही भारतीय जनता पक्षावर टीका करण्याची मोठी संधी प्राप्त झाली. TMC’ने यासंदर्भात ट्विट करत अमित शाह यांना थेट बाहेरचे म्हणजे दुसऱ्या राज्यातील संबोधलं. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगालच्या संस्कृतीपासून पूर्णपणे अनभिज्ञ आहेत की त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना एका चुकीच्या प्रतिमेचा पुष्पहार अर्पण करून एकप्रकारे त्यांना अपमानित केलं आहे. तसेच त्यांची प्रतिमा दुसऱ्या कोणाच्या पायाजवळ ठेवली. त्यामुळे ते कधी पश्चिम बंगालचा सन्मान करु शकतील?”

दुसरीकडे या गडबडीवर आदिवासी संघटना ‘भारत जकात माझी परगना महल’ या संघटनेने देखील संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात संघटनेच्या नेत्यांनी म्हटलं की, “या घटनेमुळे आदिवासी समाजामध्ये स्वतःला फसवल्याची भावना आहे. या घटनेमुळे आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत.” यावेळी आदिवासी समाजातील लोकांनी या घटनेमुळे बिरसा मुंडा यांचा अपमान झाल्याचे म्हणत प्रतिमेजवळ गंगाजल शिंपडून त्याच कथीत शुद्धीकरण केलं.

 

News English Summary: The second leader in the Modi government and Union Home Minister Amit Shah was on a visit to Bengal on Thursday. At that time, he visited the tribal-dominated Bankura and paid homage to the image of freedom fighter Birsa Munda. Meanwhile, it has come to light that instead of Birsa Munda, he greeted another image with a wreath. This has led to controversy. Due to this mistake made by Amit Shak, the ruling party Trinamool Congress in West Bengal has castigated Shah. While expressing anger against Shah, he is referred to as ‘outsider’.

News English Title: Union Home Minister Amit Shah Garlands wrong statue TMC calls him outsider News updates.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x