13 December 2024 12:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Aryan Khan NCB Custody Extended | आर्यन खानच्या कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ

Aryan Khan NCB Custody Extended

मुंबई, ०४ ऑक्टोबर | केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी रविवारी अटक केली होती. यानंतर कालच आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज आर्यनसह इतर सात आरोपींना (Aryan Khan NCB Custody Extended) मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.

Aryan Khan NCB Custody Extended. The Central Anti-Narcotics Squad (NCB) on Sunday arrested eight people, including actor Shah Rukh Khan’s son Aryan, for carrying drugs on a passenger ship :

त्यामुळे आर्यनला जेल होणार की बेल मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर याबाबत न्यायालयाने निर्णय दिला. त्यानुसार आर्यन खानबरोबरच मुनमुन धमेच्या व अरबाज सेठ मर्चंट या दोघांना देखील सात ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली गेली आहे. यानंतर त्यांना ७ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं. अन्य आरोपींबाबत देखील लवकरच निर्णय होणार आहे.

तब्बल अडीच तास युक्तिवाद, 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी:
ड्रग्ज प्रकरणात देण्यात आलेली एका दिवसाच्या कोठडीची मुदत सपंल्यानंतर आर्यन खानला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेजा या तिघांना कोठडी सुनावली. या तिघांच्या चौकशीतून काय माहिती समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोर्टाने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना आरोपींच्या कोठडीबाबत विचारलं तेव्हा त्यांनी कोठडी हवी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोर्टाने 7 तारखेपर्यंत कोठडी सुनावली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Aryan Khan NCB Custody Extended till 7th October.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x