13 December 2024 1:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

आमदारांच्या सह्यांचं पत्र चुकीच्या हेतूनं वापरण्यात आलं: अभिषेक मनू सिंघवी

NCP, Congress, Shivsena, BJP

नवी दिल्ली: सिंघवी राष्ट्रवादीच्या वतीनं युक्तीवाद करताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, ‘आमदारांचं पत्र चुकीच्या हेतूनं वापरण्यात आलं. राज्यपालांची फसवणूक करण्यात आली. ते पत्र वेगळ्या कारणासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र, ते दुसरीकडं जोडण्यात आलं. दोन्ही पक्ष बहुमत चाचणीसाठी तयार आहे. मग उशीर कशासाठी केला जातोय. एकतरी आमदार भारतीय जनता पक्षासोबत गेला आहे का? तसं सांगणार पत्र आहे का? न्यायालयानं दिलेले जुने आदेश डावलता येणार नाही. त्यामुळं हंगामी अध्यक्ष नेमून बहुमत चाचणी आजच व्हायला हवी,’ अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडं केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बाजू मांडतांना मुकूल रोहतगी यांनी महत्त्वाचा युक्तीवाद केला. ५४ आमदारांचा आम्हाला पाठिंबा असून, एक पवार आमच्या सोबत आहेत. तर दुसरे आमच्या विरोधात आहेत. त्यांच्या कुटुंबातील वादाशी आम्हाला देणंघेणं नाही. राज्यपालांनी पत्रांच्या आधारे निर्णय घेतला आहे,” असं रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं.

भारतीय जनता पक्षानं सरकास स्थापनेचा दावा केला. राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला दिलेल्या समर्थनाचं पत्र सॉलिसीटस जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सादर केलं आहे. अजित पवारांनी ५४ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं होतं. ज्यात राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात यावी आणि स्थिर सरकार यावं, यासाठी आपण भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत असल्याचं पवारांनी या पत्रात म्हटल्याचं तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेलं पत्रही न्यायालयासमोर सादर करण्यात आलं आहे. “माझ्यासोबत १७० आमदारांचा पाठिंबा असून, अपक्षही आमदार सोबत आहेत,” असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. हे पत्र तुषार मेहता यांनी न्यायालयाला वाचून दाखवलं. मात्र त्यानंतर जस्टीस खन्ना यांनी बचाव पक्षाच्या वकिलांना विचारलं की ‘सध्या त्या आमदारांचं मत आणि समर्थाबद्दल काय स्थिती आहे? त्यावर आम्हाला माहित नाही असं उत्तर देण्यात आलं. या एका प्रश्नामुळे भाजपाला सेटबॅक मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणखी तीन आमदार परतले आहेत. त्यामुळे अजित पवारांसोबत केवळ एक आमदार राहिला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यात शिवसेनेनं महत्त्वाची भूमिका बजावली. अजित पवारांसोबत गेलेले आमदार माघारी फिरल्यानं विश्वासदर्शक ठरावावेळी नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

स्वपक्षाचे १०५ आमदार आणि १५ अपक्ष आमदारांचा पाठिंबा अशी आकडेमोड भारतीय जनता पक्ष प्रथमपासून करीत आहे. दुसरीकडे राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीने सादर केलेल्या पत्रावर मात्र पक्षाच्या ४१ आमदारांच्या सह्या आहेत. यामुळे १३ आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असतील तर भारतीय जनता पक्षाकडील संख्याबळ १३३पर्यंत पोहोचते. त्यातच छोटे पक्ष आणि अपक्ष अशा उर्वरीत १४ पैकी काही आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाचा हा डाव पुरता फासल्यात जमा आहे. शरद पवार देखील पूर्णपणे कार्यरत झाल्याने सध्या भारतीय जनता पक्षानेच स्वतःकडे असलेल्या अपक्ष आमदारांना गुजरात किंवा इतर भारतीय जनता पक्षाशासित राज्यात धाडण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. कारण आता इतर छोट्या पक्षातील आमदार आणि अपक्ष आमदार देखील फुटले तर भारतीय जनता पक्षाची पंचायत होण्याची शक्यता अधिक आहे. कारण, राष्ट्रवादी आणि शिवसेना देखील भारतीय जनता पक्षाच्या गोटातील आमदारांना स्वतःकडे खेचत असल्याचं वृत्त आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x