13 April 2021 3:05 AM
अँप डाउनलोड

गुजरात निवडणुकीवेळी जपान'चे पंतप्रधान, आता २०१९च लक्ष? डोनाल्ड ट्रम्प यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुका भाजपसाठी प्रचंड महत्वाच्या आहेत. त्यामुळे हवा निर्मितीसाठी सर्व प्रयत्नं केले जातील अशीच शक्यता आहे. त्याचाच भाग असा की येत की पुढील वर्षी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन भारत सरकारसाठी विशेष करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारताकडून देण्यात आलेल्या या निमंत्रणाची बातमी अनेक वर्तमान पत्रात झळकल्या आहेत. भारताकडून हे निमंत्रण एप्रिलमध्ये पाठविण्यात आल्याचं समोर येत आहे. या निमंत्रणावर अमेरिकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु भारताला ट्रम्प प्रशासन सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा आहे.

याआधी २०१५ मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता २०१९ मधील प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रीत करण्याची योजना आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांना निमंत्रित करून मोठं मोठे इव्हेंट केले होते आणि हवा निर्मिती करण्यात आली होती.

त्यावेळी गुजरातमध्ये इतके सारे प्रयत्नं करून सुद्धा काँग्रेसने मोठी कामगिरी केली होती. अगदी शेवटच्या क्षणी थोड्या फरकाने भाजपचा विजय झाला होता. त्यामुळे अशाप्रकारे मोठ्या देशांच्या नेत्यांना निमंत्रित करून काही फरक पडतो असं वाटत नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1480)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x