26 April 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Auto world | हैदराबादच्या स्टार्टअपचा कमाल | ७ रुपयांत १०० किमी | ५० हजारात बाईक

Atum electric Bike, Hyderabad startup, Marathi News ABP Maza

हैदराबाद, ७ सप्टेंबर : हैदराबादची इलेक्ट्रीक व्हेईकल कंपनी Atumobile प्रायव्हेट लिमिटेडने एक जबरदस्त मायलेज देणारी इलेक्ट्रीक बाईक बाजारात आणली आहे. या बाईकचे नाव आहे Atum 1.0. या बाईकची बेस प्राईजही ५० हजार रुपये आहे. Atum 1.0 ही ICAT ने मंजुरी दिलेली कमी स्पीडची इलेक्ट्रीक बाईक आहे. यामुळे या बाईकसाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, तसेच ड्रायव्हिंग लायसनचीही गरज राहणार नाही.

या बाईकमध्ये पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी ४ तासांपेक्षा कमी वेळात फुल चार्ज होते. कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज झाली की बाईक १०० किमीची रेंज देते. ही बॅटरी दोन वर्षांच्या वॉरंटीसह येते. तसेच ही बाईक विविध रंगात उपलब्ध आहे. Atum 1.0 मध्ये लाईटवेट ६ किलोचे बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही बॅटरी काढता येत असल्याने युजर ही बॅटरी काढून कुठेही थ्री पिन सॉकेटद्वारे चार्ज करू शकणार आहेत.

कंपनीचा दावा आहे की, १०० किमीच्या रेंजसाठी ही बाईक ७ ते १० रुपये खर्च करते. म्हणजेच 1 युनिट वीज चार्जिंगसाठी वापरली जाते. कंपनीनुसार बाजारात उपलब्ध असलेल्या बाईकचा १०० किमीचा खर्च हा ८० ते १०० रुपये आहे. या इलेक्ट्रीक बाईकमध्ये 20X4 फॅट बाईक टायर देण्यात आलेले आहेत. या बाईकमध्ये लो सीट हाईट, LED हेडलाइट, इंडीकेटर्स, टेललाइट आणि फुल टिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. Atum 1.0 इलेक्ट्रिक बाइक तीन वर्षांच्या संशोधनानंतर बनविण्य़ात आली आहे.

 

News English Summary: The Indian startup company says that the Atum 1.0 is approved by the International Centre for Automotive Technology as a low-speed bike. Featuring a cafe-racer type design, it has a Lithium Ion battery that takes under 4 hours to charge fully, and offers a range of 100 km. Some of the bike’s features include a digital display and LED headlight, indicators & taillight. The vehicle is to be launched this year for a price of around Rs. 50,000.

News English Title: Atum electric Bike Hyderabad startup Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#cars Bikes(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x