19 April 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

कोरोना आपत्ती हे जसे आव्हान आहे तशी संधी सुद्धा - राहुल गांधी

Covid19, Corona Crisis, Rahul gandhi

नवी दिल्ली, १८ एप्रिल: भारतात करोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याची स्थिती दिसतेय. संपूर्ण देशात आत्तापर्यंत १४ हजारांहूनन अधिक रुग्ण आढळले आहेत तर जवळपास ५०० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दरम्यान राहुल गांधी यांनी एक आशादायक ट्विट केलंय. कोरोना व्हायरसनं भारताला आपल्या तज्ज्ञांच्या मदतीनं अभिनव उपायांद्वारे या आजाराशी लढण्याची एक संधी दिलीय, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

राहुल गांधी यांनी गुरुवारी व्हिडिओ स्ट्रिमिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारच्या सध्याच्या काही निर्णयांवर टीका केली होती. ते म्हणाले होते, कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वात मोठे अस्त्र म्हणजे चाचण्या करणे. सध्या आपण खूप कमी प्रमाणात चाचण्या करीत आहोत. त्याचबरोबर चाचण्या कशा करायचा, याची योग्य रणनितीही आपण आखलेली नाही. आपण लवकरात लवकर रॅपिड टेस्टिंगला सुरुवात केली पाहिजे. जर आपण चाचण्यांची संख्या वाढवली नाही तर आपल्याला पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवायला लागेल, असे त्यांनी म्हटले होते.

अमेठी जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते अनिल सिंह म्हणाले की, अमेठीमध्ये कुणीही उपाशी राहणार नाही. प्रत्येक गरजूंपर्यंत मदत साहित्य पुरवले जाणार आहे. लोकसभा मतदारसंघातील ८७७ ग्रामपंचायती आणि नगर पंचायत / नगरपालिकांमध्ये राहुल गांधी यांच्या मार्फत १६,४०० रेशन किट्सचं वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी ट्विट केले असून, कोरोना हे एक मोठे आव्हान तर आहेच, पण त्याचबरोबर संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: In India, it is seen that the status of Corona is coming under control. So far, more than 14,000 patients have been found across the country, and about 3 patients have lost their lives. Meanwhile, Rahul Gandhi made a promising tweet. Rahul Gandhi has said that Corona Virus has given India a chance to fight the disease through innovative solutions with the help of its experts.

News English Title: Story corona virus update congress MP Rahul Gandhi calls innovative solutions fight corona Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x