14 December 2024 2:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

भारतावर हल्ला करण्यासाठी जैश आणि ISI'ची बैठक | सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

Jaish-e-Mohammed, ISI, Indian intelligence

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट : भारतावर मोठा हल्ला घडवण्याची तयारी पाकिस्तानकडून केली जात आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच रावळपिंडीत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयमध्ये एक गोपनीय बैठक झाली. यामध्ये भारतावर दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. या बैठकीची माहिती मिळताच भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.

गुप्तचरांच्या माहितीनुसार, अब्दुल रौफ असगरचा भाऊ मौलाना अम्मारही उपस्थित होता. अब्दुल रौफ असगर जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर मौलाना अम्मारने एक ऑडिओ संदेश प्रसिद्ध केला होता. त्यात त्याने इंडियन एअर फोर्सचे फायटर पायलट अभिनंदन वर्थमान यांची सुटका केल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली होती. जैशच्या तालीम-अल-कुरान मदरशाला लक्ष्य केल्याबद्दल बदला घेण्याची धमकी सुद्धा दिली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

गुप्तचर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, रावळपिंडीत अब्दुल रौफ आणि आयएसआयमध्ये एक बैठक झाली. या बैठकीचं आयोजन इस्लामाबादमधून करण्यात आलं होतं. जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी आणि कारी जरारनं भारतावरील हल्ले भारतावरील हल्ल्यांची तीव्रता वाढवण्याच्या योजनेवर चर्चा केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशीच बैठक पुलवामा हल्ल्याच्या आधीदेखील झाली होती.

 

News English Summary: The Indian intelligence establishment is on high alert after being tipped about a meeting between Jaish-e-Mohammed’s de-facto ‘emir’ Maulana Abdul Rauf Ashgar and two top rank ISI officials at Rawalpindi on August 20. Ashgar’s brother Maulana Ammar was also present at that meeting, says a confidential intelligence note.

News English Title: Jaish ISI Meeting Puts Indian Intelligence Agencies On High Alert News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x