17 March 2025 8:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TDS New Rules l पगारदारांनो, 1 एप्रिल 2025 पासून TDS चे नवे नियम लागू, टॅक्स डिडक्शनमध्ये असे बदल होणार Yes Bank Share Price | येस बँक गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, शेअर्स प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK Rattan Power Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ आला पेनी स्टॉक, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, शेअर प्राईस 42 रुपये, मिळेल 56% परतावा - NSE: IRB Horoscope Today | 18 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस, तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 18 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या GTL Infra Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 49 पैसे, 492% परतावा देणारा पेनी स्टॉक फोकसमध्ये - NSE: GTLINFRA
x

आज राज्यात तब्बल १४,२१९ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

Covid19, Corona Virus, Maharashtra

मुंबई, २४ ऑगस्ट : आज राज्यात तब्बल १४ हजार २१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याने थोडा दिलासा मिळत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात ११ हजार ०१५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आत्तापर्यंत राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६ लाख ९३ हजार ३९८ इतकी झाली आहे. तर, राज्यात सध्या १ लाख ६८ हजार १२६ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ चाचण्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ नमुन्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९२ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.

 

News English Summary: Today, newly 11015 patients have been tested as positive in the state. Also newly 14219 patients have been cured today, totally 502490 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 168126 The patient recovery rate in the state is 72.47% News latest Updates.

News English Title: 14219 Patients Have Been Cured Today In Maharashtra News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x