Bhagwangad Dasara Melava | सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडणार की नाही? - पंकजा मुंडे
परळी, १५ ऑक्टोबर | पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध भाजपअंतर्गत राजकारण पुन्हा जोर पकडण्याची चिन्ह आहेत. विशेष आज पंकजा मुंडे भगवानगडावर शक्ती प्रदर्शन करणार असल्याने त्यांच्या सभेला केंद्रीय मंत्री सुद्धा उपस्थित होते असं (Bhagwangad Dasara Melava) राजकीय वजन वाढवणारं वातावरण होऊ द्यायचं नाही असा निर्णय अखेरच्या क्षणी राज्यातील एक वरिष्ठ नेत्याने घेतल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे त्यासाठी औरंगाबादहून बीडच्या दिशेने निघालेल्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना संबंधित भाजप नेत्याचा कॉल गेला आणि सूत्र हलली असं भाजपच्या गोटातून वृत्त हाती आलं आहे.
Bhagwangad Dasara Melava. Will the government fall or not? The opposition gives a moment every day that the government will fall and the ruling party says the government will not fall. Get out from this thought said Pankaja Munde :
अनेक मराठी माध्यमांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्याचे थेट प्रक्षेपण केल्याने संबंधित नेत्याची पोटदुखी वाढली असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आज भगवानगडावर मोठा दसरा मेळावा झाला. या मेळाव्याला हजारो लोक उपस्थितहोते. या मेळाव्याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड येणार असल्याचं सांगितलं जात होतं. कराड औरंगाबादहून बीडच्या दिशेने निघाल्याचंही सांगदितलं जात होतं. पण पंकजा मुंडे भाषणाला उभ्या राहिल्या तरी कराड अखेरपर्यंत आले नाही. त्यामुळे दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या कृपेने मोठे झालेले नेते पंकजा मुंडेंविरोधात त्यांच्याविरोधात फिरवण्याचे पक्षांतर्गत चक्र कोणी सुरु केलं याची चर्चा रंगली आहे.
सावरगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा पार पडला. लॉकडाऊननंतर दोन वर्षानंतर हा मेळावा पार पडत असल्याने या मेळाव्याला हजारो लोकं उपस्थित होते. या मेळाव्याला भागवत कराडही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात होतं. ते औरंगाबादहून परळीला येणार असल्याचं सांगितलं जात होतं. वरून ते हेलिकॉप्टरनं पंकजांसोबत सावरगावच्या दसरा मेळाव्याला पोहोचणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. पण अखेरपर्यंत ते आलेच नाहीत. त्यामुळे उपस्थितांनी देखील शंका व्यक्त केली आहे.
या मेळाव्यात पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे भाषण झालं. खासदार प्रीतम मुंडे यांनी 15-२० मिनिटे भाषण केलं. पण या भाषणात त्यांनी एकाही वेळा कराड यांचा उल्लेख केला नाही. पंकजा मुंडे यांनीही भाषणात कराड यांचा उल्लेख केला नाही. शिवाय कराड यांचा स्टेजवरील पोस्टरमध्येही उल्लेख नव्हता. त्यामुळे कराड येणार नाहीत हे आधीच पंकजा यांना माहीत होतं का? अशी चर्चाही रंगली आहे.
महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या स्वप्नातून बाहेर पडा:
अत्यंत अवेशात आणि आक्रमकपणे पंकजा मुंडे यांनी आपले मुद्दे मांडले. हे मुद्दे मांडतानाच त्यांनी थेट स्वपक्षीयांनाही जोरदार टोले लगावले. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडणार की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार पडणार नाही. आता यातून बाहेर पडा. विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत लक्ष घाला, असा घरचा आहेरच पंकजा यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
मोदी सरकारने केलेल्या नव्या मंत्रिमंडळ विस्तरात मराठवाड्यातून डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. कराड यांना केंद्रात अर्थराज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा नाराज होत्या. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कराड यांना त्यांनी शुभेच्छाही दिली नव्हती. त्यानंतर वरळी येथील निवासस्थानी झालेल्या सभेत त्यांनी भाजप नेत्यांवर नाव न घेता टीकाही केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी कराड यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिली होती. या घटनेनंतर दोन ते तीन वेळा कराड आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्याने त्यांच्यात दिलजमाई झाल्याचंही बोललं जात होतं. परंतु, आयत्यावेळी कोणी चक्र फिरवली याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.
News Title: Bhagwangad Dasara Melava government will fall or not first get out from this thought said Pankaja Munde.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Metro Job | आता मेट्रोमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण; अर्ज प्रक्रिया, पगार आणि पात्रता काय असेल जाणून घ्या