13 November 2019 11:58 PM
अँप डाउनलोड

युनिसेफकडून सुप्रिया सुळेंचा पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेनने गौरव

बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार तसेच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा युनिसेफ या जागतिक संघटनेने ‘पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेन’ने गौरव केला आहे. अनेक अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात भरपूर मदतकार्य सुप्रिया सुळे यांनी केल्याने त्यांच्या कामाची दखल युनिसेफने घेतली आहे. त्याच्या या कार्याची दखल खुद्द संयुक्त राष्ट्र संघाने घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे.

विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंना यापूर्वी ‘संसदरत्न’ पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. तसंच भारतीय संसदेत सर्वाधिक हजेरी, सर्वाधिक प्रश्न विचारले म्हणून त्यांचे अनेक वेळा कौतुक सुद्धा करण्यात आले आहे. दरम्यान, युनिसेफने दिलेला हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांनी बारामतीमध्ये कर्णबधिर मुलांसाठी केलेल्या विशेष मदतकार्याची दखल घेऊन प्रदान केला आहे.

सुप्रिया सुळेंनी केवळ ८ तासांमध्ये बारामतीतील तब्बल ४,८४६ कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र बसवण्याची किमया सध्या केली आहे. या उपक्रमासाठी अमेरिकेतील स्टार्की फाउन्डेशन,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट तसेच पवार पब्लिक चॅरिटेबल ट्र्रस्ट या सेवाभावी संस्थांची मदत सुद्धा त्यांनी घेतली होती. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असून इतक्या कमी वेळात ४,८४६ मुलांना श्रवणयंत्र बसवण्याच्या विक्रमाची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याआधीच नोंद करण्यात आली आहे.

तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयी सुविधा,विद्यार्थिनींना केलेला सायकल वाटप या सगळ्या कार्याची दखल खुद्द युनिसेफने घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(7)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या