19 July 2019 9:58 AM
अँप डाउनलोड

मालेगावात सत्तेसाठी धर्म विसरून MIM सोबत सेटलमेंट, तर औरंगाबादमध्ये घरात घुसून मारण्याची सेनेकडून धमकी

मालेगावात सत्तेसाठी धर्म विसरून MIM सोबत सेटलमेंट, तर औरंगाबादमध्ये घरात घुसून मारण्याची सेनेकडून धमकी

औरंगाबाद: महानगरपालिकेत खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेदरम्यान गोंधळ घातला होता. तर काही नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर महापौरांनी एमआयएमच्या काही नगरसेवकांचे एका दिवसासाठी निलंबन केले होते. याच प्रकरणावरून शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातील संपादकीयमधून एमआयएमवर निशाणा साधला आहे. लोकसभेत शिवसेनेच्या झालेल्या निसटत्या पराभवामुळे संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनला नाही. ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा असल्याचे सांगत शिवसेनेने एमआयएमवर हल्लाबोल केला.

दरम्यान, आज औरंगाबादमध्ये हिंदू धर्मावरून आगपाखड करणाऱ्या शिवसेनेने याच एमआयएमच्या मदतीने मालेगावमध्ये छुपी हातमिळवणी केली होती. राज्यभर विस्तारत असलेल्या हैदराबादस्थित ‘एमआयए’ पक्षाला शिवसेनेकडून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विरोध होत होता. तसेच २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शिवसेनेच्या नेत्यांनी ‘एमआयएम’च्या नेत्यांवर विखारी टीका केली होती. मात्र, सत्तेसाठी तत्त्व, विचारधारा बाजूला ठेवून काेण कुणाशी हात मिळवणी करील याचा नेम नसतो. मालेगाव महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस- जनता दल आघाडी आणि ‘महाज’ व मित्रपक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार होती.

त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएम समर्थक नगरसेवकांनी ‘महाज’च्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता आणि शिवसेना नगरसेवकही ‘महाज’च्याच पाठीशी असल्याचे अप्रत्यक्षरीत्या पाहायला मिळालं होतं. म्हणजेच त्यावेळी ‘महाज’चा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना व एमआयएम नगरसेवकांनीच अप्रत्यक्ष हातमिळवणी केल्याचे अनोखे चित्र त्यावेळी दिसून आले होते.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या