27 June 2022 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल
x

यूपीत ‘बुआ- भतीजा’ लोकसभेसाठी एकत्र; भाजपला किमान ५० जागांवर फटका बसण्याची शक्यता

लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीत मोठी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीत बसपा आणि सपामध्ये मोठी मत विभागणी झाल्याने त्याचा थेट फायदा भाजपला झाला होता. परंतु, यंदा वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. कारण आजच्या मायावती आणि अखिलेश यांच्यामधील संयुक्त पत्रकार परिषदेतून भाजपची डोकेदुखी वाढणार आहे हे निश्चित दिसते.

आजच्या या राजकीय बातमीने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची चिंता शंभरपट वाढली आहे. दरम्यान, या आघाडीत सपा- बसपाने काँग्रेसला स्थान दिलेले नाही. परंतु, रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात सपा किंवा बसपा स्वतःचा उमेदवार देणार नाहीत, असे मायावतींनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

लखनौतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आज दुपारी अखिलेश यादव आणि मायावती यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेस तसेच भाजपावर या दोन्ही प्रमुख पक्षांवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या काळात देशात घोषित आणीबाणी होती, तर भाजपच्या काळात देशात अघोषित आणीबाणी आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी यावेळी केली.

पुढे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, काँग्रेस- भाजपाची अवस्था समान आहे, दोन्ही सरकारच्या कार्यकाळात घोटाळे झाले आहेत, काँग्रेसच्या काळात त्यांना बोफोर्स घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागली होती, तर आता भारतीय जनता पक्षाला राफेल घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागेल, असा दावा मायावतींनी यावेळी बोलताना केला. तसेच भविष्यात काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, आम्ही काँग्रेससोबत गेल्याने नेहमी त्यांचा फायदा झाला, परंतु आम्हाला यातून काहीच मिळाले नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मायावतींना पाठिंबा देताना स्पष्ट केले की, ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने मायावतींवर आक्षेपार्हटिपणी केली होती, तेव्हाच महाआघाडीची पायाभरणी झाली होती. कारण मायावतींचा अपमान हा माझा अपमान होता असे अखिलेश यादव यांनी स्पष्ट सांगितले. दरम्यान, भविष्यात पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा देणार का, या प्रश्नाचे सुद्धा अखिलेश यादव यांनी सूचक उत्तर दिले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकली. ते प्रश्नाला उत्तर देताना म्हणॆ की, आम्ही कोणाला पाठिंबा देणार हे सर्वांनाच माहित आहे

युपीमध्ये लोकसभेच्या तब्बल ८० जागा असून बहुजन समाज पार्टी ३८ आणि सपा ३८ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी रायबरेली आणि अमेठी या २ मतदारसंघात काँग्रेसविरोधात आम्ही उमेदवार देणार नाही, असे सुद्धा मायावतींनी सांगितले. तर उर्वरित जागा आमच्या महाआघाडीत सामील होणाऱ्या अन्य छोट्या पक्षांसाठी सोडल्या आहेत, हे त्यांनी नमूद केले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x