27 July 2024 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री की पुणे-पिंपरीचे | चंद्रकांत पाटल यांचं टीकास्त्र

Chandrakant Patil

पुणे, १९ सप्टेंबर | मला हे कळत नाही की उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पुणे, पिंपरीचे, अख्ख्या कोरोना काळात ते कुठे नागपूरला चंद्रपूरला गेले का? का राज्यातील इतर जिल्हे कुठे आहेत, त्यांना माहीतच नाही, असे म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच अजित पवार यांनी पुणे, पिंपरीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे अनेक नगरसेवक संपर्काच असल्याचे विधान केले होते. मात्र लोकांचं मोदींवर विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही कितीही लोकं पळवण्याचा प्रयत्न केला तरी, कोणीही जाणार नाही, असा विश्वासही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील मानाचे आणि प्रमुख गणेशमंडळाला पाटील यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री की पुणे-पिंपरीचे, चंद्रकांत पाटल यांचं टीकास्त्र – Ajit Pawar is deputy CM of Maharashtra  or Pune Pimpri Chinchwad says BJP state president Chandrakant Patil :

भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता, पाटील म्हणाले फक्त बातम्या निर्माण केल्याने काहीही होत नाही. 22 महिने झाले आहेत, असच चालले आहे. आमच्या एकाही आमदाराला हात लावला नाही. उलट आम्ही पंढरपूरची पोट निवडणूक जिंकली, असा टोलाही पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

अजित पवारांचा चेहेरा उघडा झाला:
पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोध केल्याने आता त्यांचा खरा चेहेरा उघडा पडला असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आम्ही सांगत होतो की राज्यांनी त्यांचा जीएसटी टॅक्स कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. गोवा आणि गुजरातमध्ये ते कमी करण्यात आले आहेत. मात्र आत्ता अजित पवार यांचा चेहेरा उघडा झाला आहे. त्यांना पेट्रोल डिझेलच्या टॅक्सवर राज्य चालवायचे आहे. त्यामुळे त्यांनी पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध केला. त्यामुळे आत्ता सर्वसामान्य नागरिकांनी अजित पवार यांना प्रश्न विचारावा की लखनऊच्या बैठकीला का गेले नाहीत, पवारांना महागाईशी काही पडलेले नाही, तुम्हाला फक्त पैसा पाहिजे, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली.

आजी माजीचा सांगितला तो किस्सा:
मला असं वाटतंय मी फारच मोठा माणुस झालो आहे, असे वाटत आहे. कोणी मला राज्यपाल करतोय, कोणी मला केंद्रात पाठवत आहे. ते ऐकून मला खूप बरं वाटते आहे, असा उपरोधिक टोला लगावत आजी माजीच्या त्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत चंद्रकांत पाटील यांनी चर्चेंवर पडदा टाकला. पाटील म्हणाले, प्रसंग असा आहे की कोरोनाच्या काळात एक नाभिक समाजाचा तरुण माझ्या संपर्कात आला आणि मी त्याला सांगितलं की एक चांगला सलून तुला उभारून देऊ आणि देहू येथे त्याच्या सासुरवाडीत ते उभे केले. त्याच्या लोकार्पणचा कार्यक्रम होता आणि तेथील माईक सिस्टीमप्रमाणे त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब भेगळे इथे यावे असे सांगत होते. तेव्हा मी म्हणालो की माजी काय म्हणताय, ते काही दिवसांनी आजी होणार आहेत. त्यात मला माजी म्हणू नका याचा काहीही विषय नव्हता आणि तीच व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली. सामाजिक जीवनात जेव्हा तुमच्या नावावर एखादं बिल लागलं की मग एकामागोमाग घटना घडत असतात. एवढंच म्हणू की त्यानिमित्ताने महाराष्ट्रात खूप राजकीय चर्चा झाली. माझा कुठलाही हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण पाटील यांनी यावेळी दिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: BJP state president Chandrakant Patil criticized DCM Ajit Pawar over Pune Pimpri Chinchwad politics.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x