16 December 2024 2:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

सीरमच्या इमारतीला भीषण आग | ५ जणांचा होरपळून मृत्यू | आरोग्यमंत्र्यांची माहिती

Five peoples death, Serum Institute, fire in Pune

पुणे, २१ जानेवारी: सीरमच्या इमारतीला भीषण आग लागलेली असून, इमारतीत पाच जणांचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. आग लागलेल्या इमारतीमध्ये पाच मृतदेह सापडलेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. तसेच तीच माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील दिली आहे.

प्रथम ४ जण अडकल्याची माहिती मिळाली होती. पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आग १०० टक्के विझल्यानंतर आपली लोकं शेवटच्या मजल्यावर पोहोचली तेव्हा मजला खाक झाला होता आणि पाच जणांचे मृतदेह पडले होते. पाचही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला,” असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी बोललेलो आहे. त्यांच्या माहितीप्रमाणे MSEZ 3 म्हणजे मांजरीमधील जो कारखाना आहे, त्यामध्ये MSEZ 3 या इमारतीला आग लागली. त्या ठिकाणी रोटा व्हायरस प्लांट इन्स्टॉलेशनचे काम चालू होते. तिथे वेल्डिंगचं काम सुरू होतं. साधारण दुपारी दोन वाजता ही आग लागली. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर जाधव आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. त्यांनी घटनास्थळावरून ही माहिती दिलेली आहे. इमारतीतील मटेरियल आग भडकण्याला कारण ठरलं, असंही राजेश टोपे म्हणालेत.

 

News English Summary: A fire broke out in the Seram building and the bodies of five people were found in the building. Health Minister Rajesh Tope said that five bodies were found in the burning building. The same information has also been given by Pune Mayor Murlidhar Mohol.

News English Summary: Five peoples death in Serum Institute fire in Pune news updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x