24 January 2025 7:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, नोमुरा इंडिया ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC
x

कंगना खोटं बोलण्यात खरंच मोदींशी स्पर्धा करतेय | कोणी केली टीका?....

Congress leader Srivatsa, Kangana Ranaut, Arnab Goswami, Whatsapp chat

मुंबई, २१ जानेवारी: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

दरम्यान, याच चॅट मधील काही धक्कादायक संवाद हे चर्चेचा विषय ठरले आहेत. विवादित कलाकार कंगना रानौत हिच्या संबंधित विषय देखील चॅट मध्ये पकडला गेला आहे. यामध्ये रितिक रोशन आणि कंगणा रानौत बाबत संवाद साधताना, “ती त्याच्या सोबत शारीरिक संबंधित होती” असा थेट शब्द प्रयोग केलेला दिसत आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या पार्थो दासगुप्ता यांच्या चॅट हिस्ट्री मधून अनेक भीषण गुपित समोर येत असल्याने देशात आणि समाज माध्यमांवर खळबळ माजली आहे.

मात्र भाजप आणि भाजप समर्थकांच्या समर्थनात समाज माध्यमांवर खींड लढवणारी कंगणा रानौत देखील अर्णबच्या चॅटींगमुळे तोंडघशी पडल्यावर केविलवाणी प्रतिक्रिया देत आहे. त्यालाच अनुसरून काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी कंगना रानौतला ट्विटरवरून टोला लगावला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “कंगना अत्यंत खालच्या थराला जाऊन उर्मिला मातोंडकर आणि स्वरा भास्करला सॉफ्ट पॉर्न स्टार्स आणि बी ग्रेड अभिनेत्री म्हणाली होती…..आज कंगना सांगते आहे की, माझे संस्कार मला अर्णबचे व्हाट्सअँप चॅट वाचावे असं सांगत नाहीत….ज्या मध्ये तिला कमी डोक्याची म्हटलं आहे….कंगना खोटं बोलण्यात खरंच मोदींशी स्पर्धा करतेय..

 

New English Summary: Kangana had spoken cheaply about Urmila Matondkar & Swara Bhaskar calling them a soft-porn star & B-grade actress. Today, Kangana is saying her ‘Sanskar’ is not allowing her to read Arnab’s Whatsapp chats calling her an EROTOMANIAC. Kangana is clearly competing with Modi in LYING said congress leader Srivatsa.

News English Title: Congress leader Srivatsa slams Kangana Ranaut over Arnab Goswami Whatsapp chat leaked news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x