11 December 2024 8:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

IPL 2021 | आजपासून IPL सुरु | संध्या. 7:30 वाजता पहिला सामना

IPL 2021

मुंबई, १९ सप्टेंबर | आयपीएल-२०२१ च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ दुबईत रविवारपासून होत आहे. पहिल्या दिवशी चेन्नई सुपरकिंग्ज व मुंबई इंडियन्सदरम्यान लढत होत आहे. आयपीएलसोबतच दुबईच्या बाजारपेठांत उत्साह दिसून येत आहे. ग्राउंडमध्ये तिकिटांच्या विक्रीसह हॉटेल्स, बार व रेस्तराँच्या मार्केटमध्येही उत्साह दिसत आहे.

IPL 2021, आजपासून IPL सुरु, संध्या. 7:30 वाजता पहिला सामना – Indian Premier League 2021 will starts from today in Dubai :

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक क्रीडारसिक स्टेडियममध्ये न जाता टीव्ही स्क्रीनवर सामन्याचा आनंद घेऊ इच्छितात. यासाठी दुबईचे अनेक रेस्तराँ, हुक्का बार व बार सज्ज आहेत. दुबईत जुमेराहस्थित ‘ओल्ड कॅस्टेलो’ रेस्तराँ ‘ओल्ड इज गोल्ड’ शैलीत चाहत्यांचा पाहुणचार करतील. भारतीय-अरबी पदार्थांसह येथे २०० पेक्षा अधिक चाहते एकत्र बसून १२ टीव्ही स्क्रीन व भव्य प्रोजेक्टर स्क्रीनवर सामन्यांचा आनंद घेतील. ओल्ड कॅस्टेलोने शेफ विशेष आयपीएल थीम मेन्यूही लाँच केला आहे.

येथे चाहते राजस्थानी रॉयल बुंदी लाडू, दिल्लीवाले चिकन टॅकोस, हैदराबादी शमी कबाब, पंजाबी कटाफी कबाब, बंबइया पावभाजी स्लायडर, सुपरकिंग करी लिव्हज झिंगे, कलकत्ता फिश एन चिप्स व बँग्लोरियन मिनी इडलीचा स्वाद घेऊ शकतील. मॉकटेलसाठी कॅप्टन कूलर, हार्ट ब्रेकर, मसालेदार अमरूद यॉर्कर, बुलफ्रॉग क्रीज, किटकॅट मिल्कशेकसह इतरही लज्जतदार पदार्थ असतील. रेस्तराँचे मालक एति भसीन यांनी दै. भास्करला सांगितले की, आयपीएल सीझन परतला आहे. बारंवा शीशा कॅफेमध्ये मित्रमंडळ व कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत आयपीएल सामन्यांचा थरार अनुभवता येईल.

IPL 2021 season first match will starts today in Dubai :

आयपीएल थीमवर मेन्यू, केक, मास्क, टी-शर्टही:
* आयएलए रेस्तराँ आणि कॅफेने हुक्का लाउंजच्या बाहेरील भिंतीचे मोठ्या स्क्रीनमध्ये रूपांतर केले आहे. चाहते प्रशंसक अरबी भोजन व हुक्क्यासह सामना पाहू शकतील.

* दुबईच्या बेकरीच्या शोरूम्समध्ये उत्साह आहे. शारजाच्या एका बेकरीत वेलकम बॅक आयपीएल केक उपलब्ध असतील. सेल्स मॅनेजर संतोष म्हणाले, स्पर्धेचा थरार जसजसा रंगत जाईल तसतशी कॉर्पोरेट व ऑफिस पार्टीसाठी केकची मागणी वाढेल.

* अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना टीमच्या थीमचे मास्क वाटले आहेत. टीम्सच्या लोगोसह मास्क व टी-शर्टची विक्रीही जोरात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Indian Premier League 2021 will starts from today in Dubai.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x