25 January 2025 7:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या
x

Viral Video | गिटार वाजवून अन् गाणं गाऊन विकली भाजी, विक्रेत्याची अनोखी शक्कल, VIDEO व्हायरल - Marathi News

Viral Video

Viral Video | सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली देखील चर्चा व्हावी आणि आपण प्रचंड वायरल व्हावं असं अनेक जणांना वाटतं. परंतु काही लोक फेमस आणि वायरल होण्यासाठी अगदी कोणत्याही थराला जाऊन विचित्र गोष्टी करतात. यासाठी ते प्रचंड प्रमाणात टोल देखील होतात.

आतापर्यंत फेमस होण्याकरिता अतरंगी सतरंगी व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. परंतु काही कलाकार असे देखील आहेत जे आपली कलाकृती सादर करण्यासाठी सोशल मीडियाचा अनोख्या पद्धतीने वापर करतात. आज आम्ही एका भाजीवाल्या गायकाबद्दल सांगणार आहोत. या गायकाने त्याच्या मधुर आवाजात भाजी विकत स्वरांचे तार छेडले आहेत. व्हिडिओ आतापर्यंत प्रचंड प्रमाणात वायरल झाला असून अनेकांनी सुंदर आणि कौतुकाच्या कमेंट केल्या आहेत. नेमकी काय आहे ही व्हिडिओ पाहूया.

व्हिडिओमध्ये भाजी विकण्यासाठी गायला गाणं :
व्हिडिओमध्ये भाजी विकून गाणं गाणारा व्यक्ती भाजीवाला नसून तो खरंच गायक आहे. त्याचं नाव जुराराह इश्फाक असं असून त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवर गायनाचे अनेक व्हिडिओ आहेत. जुराराहची इंस्टाग्रामवर प्रचंड फॅन फॉलोविंग असून त्याच्या अकाउंटवर 200 हून अधिक गायनाच्या व्हिडिओज आहेत. हा मुलगा गाणं जाताना म्हणतो की,” गोभी लेलो मुझसे सस्ते में, लोकी, टिंडे एए, करेले एए”. या गायकाने गिटार वाजवत अतिशय सुंदर आणि मधुरा आवाजा या वाक्याचं गाण्यांमध्ये रूपांतर केलं आहे. ही व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zurarah Ishfaq (@zurarahh)

व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की,”अंकल को सपोर्ट करने जाना”. त्याचं कॅप्शन पाहून कळतंय की, भाजीची गाडी त्याची नसून एखाद्या भाजीविक्रेत्याचीच आहे. केवळ भाजी विक्रेत्याची भाजी विकली जावी सोबतच आपल्यामधील टॅलेंटही लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी जुराराहने केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. त्याच्या या व्हिडिओचं अनेकांनी लाईक केलं असून कमेंटमध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Latest Marathi News | Viral Video 18 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x