5 December 2024 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Festive Season Fashion | सणासुदीच्या काळात हवा आहे परफेक्ट लूक, तर या 4 साड्यांचे कलेक्शन तुमच्याजवळ असलेच पाहिजे

Festive Season Fashion

Festive Season Fashion | लग्न समारंभात आणि सणासुदींच्या काळामध्ये महिलांना साज शृंगार करून मिरवायला फार आवडते. सगळ्या मैत्रिणीपेक्षा माझी साडी सुंदर, चमकदार आणि लखलखित असावी असं प्रत्येकीलाच वाटतं. त्याचबरोबर सुंदर अशा साडीमुळे मी सर्वांमध्ये सेलिब्रेटीसारखी चमकावी अशी इच्छा देखील बऱ्याच महिलांची असते. आता यासाठी तुम्हाला साड्यांचे चांगले कलेक्शन शोधणे अत्यंत गरजेचे आहे. आज आम्ही खास फेस्टिव्ह सीझनसाठी साडी प्रेमी महिलांना काही खास कलेक्शन सांगणार आहोत.

1) एम्ब्रोईडरी साडी :
सध्या बाजारामध्ये कांजीवरमपासून ते बनारसी सिल्कपर्यंत वेगवेगळ्या साड्या उपलब्ध आहेत. परंतु या साड्यांचे कलेक्शन सध्या जुने झाले आहे. त्या ऐवजी तुम्ही संपूर्ण प्लेन आणि एम्ब्रोईडरी असलेली साडी निवडू शकता. आता दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला आहे. तुम्ही दिवाळीच्या सणामध्ये सुंदर अशी प्लॅन एम्ब्रोईडरी साडी नेसून आकर्षक दिसू शकता. यासाठी तुम्ही बेबो पिंक रंगाची ठसकेदार गुलाबी साडी निवडू शकता. या साडीवर तुम्ही एम्ब्रॉयडरी असलेलाच गडद हिरव्या रंगाचा ब्लाऊज निवडू शकता.

2) बनारसी सिल्क साडी :
तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये बनारसी सिल्क साडी समाविष्ट करू शकता. येत्या फेस्टिवल सिझनमध्ये बनारसी सिल्क साडी तुमच्या अंगावर अतिशय खुलून दिसेल. यामध्ये तुम्हाला मीडियम, लाईट, डार्क सर्व प्रकारचे रंग पाहायला मिळतील. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे या साडीचा फ्लो. साडी तुमच्या अंगावर अतिशय चापुन चोपून बसेल त्याचबरोबर सिल्क मटेरियल असल्यामुळे तुमचा लूक अतिशय खुलून दिसेल.

3) रेडीमेड साडी :
सध्या रेडिमेड साडीचा ट्रेंड प्रचंड वायरल होत आहे. बऱ्याच महिला साडी नेसण्यात वेळ वाया घालवतच नाहीत. पायजण्यासारखी पटकन साडी नेसायची आणि कमरेला कच्चंकन गाठ मारायची की विषय संपला. पुढे सुंदर असा पदर काढायचा किंवा वन साईड मोकळा पदर ठेवायचा. अशा पद्धतीने फेस्टिवल सीजनमध्ये तुम्ही सॉफ्ट नेट, सिल्क किंवा काटपदराची रेडीमेड साडी बाहेरून शिवून देऊ शकता. रेडीमेड साडीमध्ये देखील तुमचा लूक अतिशय सुंदर दिसेल.

4) चंदेरी सिल्क साडी :
काही महिलांना अतिशय भरगच्च आणि हेवी साड्या अजिबात आवडत नाहीत. अशा महिलांना कायम चांगलं पण हलकं मटेरियल असलेली साडी आवडते. यासाठी तुम्ही चंदेरी सिल्क साडी वापरू शकता. चंदेरी सिल्क साडी ही अतिशय मऊसुत असून ती अंगावर अजिबात फुगत नाही. त्याचबरोबर या साड्यांमध्ये तुम्हाला काटपदराच्या वेगवेगळ्या डिझाइन्स आणि वरायटी पाहायला मिळतील. तुम्ही फेस्टिवल सीझनमध्ये चंदेरी सिल्क किंवा चंदेरी कॉटन साडी देखील परिधान करून स्वतःचा लूक सुंदर बनवू शकता.

Latest Marathi News | Festive Season Fashion 18 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Festive Season Fashion(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x