27 June 2022 2:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | दर महिन्याला गुंतवा 1302 रुपये | मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख | योजनेबद्दल जाणून घ्या Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या
x

भाजपा व शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित

मुंबई : शिवसेनेच्या स्वबळाचा नारा आणि त्यामुळे भाजपची झालेली राजकीय गोची आता स्पष्ट दिसू लागली आहे. भाजपा शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही पक्षांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा आघाडीला होईल. त्यामुळे भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांचा आगामी निवडणुकीत पराभव होऊ शकतो असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंदूस्तान टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केलं आहे.

आगामी निवडणूका स्वबळावर लढविण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित होणार, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवसेना हा भाजपचा जुना मित्रपक्ष असून दोन्ही पक्षांची विचारधारा एक समानच आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेला युतीसाठी हात पुढे केला आहे. अमित शहा यांच्या मातोश्री भेटीनंतर राज्यातील भाजपचे नेते शिवसेनेबाबत नरमाईची भूमिका घेत आहेत.

भाजप आणि शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला होईल आणि त्यामुळे शेवटी भाजपा शिवसेना या दोन्ही पक्षांचा पराभव होईल. त्यामुळे युतीत राहून निवडणूका लढविल्यास दोन्ही पक्षांचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. भाजप सुद्धा स्वबळावर लढण्यास तयार आहे. आमचा केवळ २- ३ जागेवर पराभव होईल. पण राष्ट्रीय स्तरावर युती अभेद्य ठेवण्याची गरज आहे. तसेच कितीही झालं तरी शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे, असे फडणवीस यांनी आवर्जून सांगितलं.

शिवसेनेची युतीसाठी मन कस वळवणार या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, राजकीय स्थितीच लोकांना युतीसाठी तयार करते. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे कट्टर विरोधक एकत्र येतील असे कधी कोणाला वाटले होते का?. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीने काँग्रेसशी फारकत घेतली होती. पण वर्षभरातच दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. त्यामुळे शिवसेनेसोबतच्या युतीबाबतही ते शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x