5 February 2023 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PURE EV ecoDryft Bike | प्योर ईवी इकोड्रायफ्ट इलेक्ट्रिक बाइक, फुल चार्ज 135 किमी रेंज, कीमत आणि फीचर्स पहा My EPF Money | नोकरदारांनो! ईपीएफओचे नियम बदलले, पैसे काढण्यापूर्वी पहा किती टॅक्स आकारला जाणार Ration Card Updates | रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव जोडायचयं, महत्वाची अपडेट, आत्ताच ही काळजी घ्या LIC Share Price | हिंडेनबर्गमुळे अदानी ग्रुप हादरला, एलआयसी शेअर्सला सुद्धा मोठा फटका बसणार? तुमचे पैसे बुडणार? Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक, मिळतील अनेक फायदे आणि वेगाने संपत्ती वाढेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, रविवारी खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा My Salary Slip | पगारदार व्यक्ती आहात? तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो माहिती आहे? लक्षात ठेवा
x

पार्थ पवारांचं जय श्रीराम ते CBI | शरद पवारांनी त्यांच्याबद्दल इतकी टोकाची प्रतिक्रिया का दिली?

Parth Pawar, Sharad Pawar, Ajit Pawar

मुंबई, १२ ऑगस्ट : सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येबाबत सुरू असलेल्या पोलीस तपासाबद्दल राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व या सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख हे समाधान व्यक्त करीत असताना अचानक पार्थ यांनी विरोधी भाजपच्या मागणीत सूर मिसळत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. राम मंदिराच्या भूमिपूजनाची घोषणा होताच शरद पवार यांनी मंदिर उभारणीमुळे कोरोना पळून जाईल, अशी काहींची समजूत आहे, असे मत व्यक्त केले. मात्र पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला.

तत्पूर्वी, म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातली मावळची जागा खुद्द शरद पवार लढवणार हे जवळपास सगळ्यांनीच निश्चित मानलं होतं. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्याप्रमाणे तयारी देखील चालवली होती. मात्र, त्याचवेळी पवार कुटुंबातली तिसरी पीढी असलेल्या पार्थ पवार यांना देखील राजकारणात उतरवण्यासाठी खुद्द अजित पवार आग्रही असल्याचं आणि त्यांच्यासाठी मावळ मतदारसंघच योग्य असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं. ‘एका कुटुंबात एकाच व्यक्तीला उमेदवारी मिळावी’, अशी भूमिका शरद पवारांनी जाहीर करून देखील पार्थ पवारांसाठीचा अजित पवारांचा हट्ट काही कमी होताना दिसत नव्हता. अखेर थोरल्या पवारांनीच माघार घेत मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडली आणि आपण निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला. काका-पुतण्यामध्ये विसंवादाची पहिली सुरुवात तिथूनच झाल्याचं दिसू लागलं.

पार्थ यांच्या अवतीभवती असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांचे असे मत आहे की, पार्थ हे राम मंदिराच्या बाजूने असलेल्या लोकभावनेचा आपण आदर करतो हे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र हा दावा पोकळ वाटतो. पार्थ हे राजकारणातील त्यांचे ‘गॉडफादर’ अर्थात त्यांचे पिताश्री अजित पवार यांच्या इशाऱ्याखेरीज अशी वक्तव्ये करणार नाहीत. शरद पवार यांच्या वक्तव्याशी सुसंगत अशी विधाने रोहित पवार हे वरचेवर करताना दिसतात तर पार्थ हे अजित पवार यांना जी वक्तव्ये जाहीरपणे करणे शक्य नाहीत ती करतायत, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच कुजबुज आहे.

पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परिणामी शरद पवार यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. ते अपरिपक्व आहेत” अशी प्रतिक्रिया देऊन पार्थ पवारांना राजकीय प्रवासात संपूर्ण आयुष्यभर ऐकावं लागेल असं वक्तव्य केलं असल्याचं म्हटलं आहे.

 

News English Summary: Parth had joined the opposition BJP’s demand for a CBI probe. As soon as the ground-breaking ceremony of the Ram temple was announced, Sharad Pawar said that some people believed that Corona would run away due to the construction of the temple. But Partha Pawar gave the slogan of ‘Jai Shriram’.

News English Title: Are Parth Ajit Pawar opinions really personal or any politics agenda behind Jay Shri Ram slogan News latest Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(426)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x