14 December 2024 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

आदित्य ठाकरे म्हणाले तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे, असं म्हणताच एकच जल्लोष...पुढे?

Disha Patani, MInister Aaditya Thackeray

संगमनेर: महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.

दरम्यान, शिवसेना आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव अनेकदा अभिनेत्री दिशा पटानीसोबत जोडलं गेलं आहे. दोघंही चांगले मित्र आहेत. तसंच अनकेदा एकमेकांना भेटले असून त्यांचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. अहमदनगरमधील आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे दिशा पटानीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी तुमची दिशा चुकली आहे असं मिश्कील उत्तर दिलं.

यावेळी अवधूत गुप्तेंनी विचारलं, आई मुलाची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेते, नंतर ती जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे देते. रश्मी वहिनींनी किती वर्ष तुमची जबाबदारी घ्यायची? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. या प्रश्नानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आईने मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे. इतर नेत्यांवर सोडली आहे”. त्यावर अवधूत गुप्तेंनी पुन्हा विचारलं, आम्हाला मध्ये मध्ये बातम्या येत असतात, आप कुछ भी बोलो, हमे आपकी बात ‘पटनी’ चाहीए. आपका उत्तर पटानी चाहीए. यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे, असं म्हणताच एकच जल्लोष झाला.

आदित्य ठाकरे यांना रॅपिड राउंड मध्ये विचारले गेलेले प्रश्न;

१. कोण जास्त आवडतं? अजित पवार की देवेंद्र फडणवीस- अजित पवार
२. जवळचं कोण? आई की बाबा – आईबाबा
३. भाजपमधील जवळचा नेता कोण?- पंकजा मुंडे की एकनाथ खडसे – महाविकास आघाडीसाठी दोन्ही जवळचे
४. सर्वाधिक धक्का कधी बसला? अजित पवारांनी पहाटे शपथ घेतल्यावर की संजय राऊत लीलावतीत गेल्यावर – दोन्ही नाही
५. सर्वाधिक ऐकलेलं वाक्य? आमची चर्चा सुरु आहे, चर्चा सकारात्मक होत आहे की मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि
शपथविधी शीवतीर्थावर – दोन्ही
६. कोणाचा जास्त राग येतो? राज ठाकरे की नारायण राणे – उत्तर टाळलं

 

Web Title:  Shivsena MLA and Minister Aaditya Thackeray react over Bollywood actress Disha Patani.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x