28 June 2022 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय Multibagger Penny Stocks | हा 3 रुपयांचा पेनी शेअर करतोय मालामाल | आजही खरेदीला खूप स्वस्त Inflation Effect | पीठानंतर आता तांदूळ अजून महागणार आहे | तुमच्या किचनचा खर्च वाढणार Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला Demat Deactivated | तुमचे डीमॅट खाते डिऍक्टिव्हेट होईल | फक्त 3 दिवस उरले | हे काम लवकर करा PPF Investment | मुलाच्या नावेही उघडता येईल पीपीएफ खाते | फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या New Labour Codes | तुम्ही 1 वर्ष नोकरी केल्यानंतरही मिळणार ग्रॅच्युइटीचे पैसे | पैशाचं गणित जाणून घ्या
x

रोहित पवार बोलतोय, तुम्ही ओळखलंच असेल; रोहित पवारांचा मोदींना कॉल आणि?

PM Narendra Modi, MLA Rohit Pawar

संगमनेर: महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.

सगळ्याच तरुण आमदारांनी दिलखुलास उत्तर दिली. यात लक्षवेधी ठरलं ते शेवटच्या भागात जादूच्या फोनवरून आपली इच्छा होईल त्या व्यक्तीशी बोलण्या अभिनय करण्याचा राऊंड. अवधूत गुप्ते यांनी प्रत्येकाच्या हातात फोन देऊन त्यांना बोलायला सांगितलं. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच फोनवरून बोलण्याचा उत्तम अभिनय केला.

यावेळी रोहित पवार यांनी थेट मोदींना फोन लावला. नाव आपण ऐकले असेल, असे म्हणत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आली आहे. यामुळे गेली पाचवर्षे जो विकास झाला नव्हता तो होईलच. पण आमच्या या युवक आणि युवतींना उद्या चांगली नोकरी मिळण्यासाठी जे केंद्राचे इंडस्ट्रीयल धोरण आहे. जे गेल्या काही वर्षांमध्ये अडचणीचे झाले आहे. ते थोडेस बदलावे लागेल. ते बदलाल अशी इच्छा व्यक्त करतो. यामुळे युवक, युवतींना नोकऱ्या मिळतील, अशी विनंती केली.

पुढे शेतकऱ्यांच्या अवस्थेवर बोलताना, शेतकऱ्यांच्या समस्यांवरही लक्ष घालावे. आम्ही खूश आहोत, इथली लोकही खूश आहेत. पण आपण केंद्र सरकारमध्ये काही बदल करावेत. चारच वर्षे राहिली आहेत. तुम्ही व्यस्त असाल, यामुळे तुमचा वेळ घेत नाही. तुम्ही जनतेची काळजी घ्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे सांगितले. यावर सभागृहात उपस्थितांनी जोरदार आवाज देत प्रतिसाद दिला.

 

Web Title:  NCP MLA Rohit Pawar call Prime Minister Narendra Modi.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x