11 April 2021 6:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

इंधन - गॅस दरवाढीचा निषेध | काँग्रेसचे आमदार सायकलवरून विधानभवनात

Maharashtra Congress, agitation, Fuel price hike

मुंबई, ०१ मार्च: ‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठले. यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते. (Maharashtra Congress agitation in state assembly against Fuel price hike)

BhagyaVivah Marathi Matrimonial

केंद्रातील मोदी सरकारने ज्या पद्दतीने महागाई वाढवण्याचा विक्रम केला आहे त्यामधून सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील केलं आहे. काँग्रेसच्या वतीने देशभरात विरोध होत आहे. परवा पेट्रोलियम मंत्र्यांनी थंडीमुळे भाव वाढल्याचा जावईशोध लावला. या पद्धतीने वारंवार थट्टा करण्याचा केंद्रातील मोदी सरकारने जो प्रयत्न सुरु आहे, लोकांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचं काम सुरु केलं आहे त्याचा विरोध आम्ही करत आहोत” असं नाना पटोले प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

विरोधक इंधन दरवाढीसंबंधी खोटी माहिती पसरवत आहेत. केंद्राने आपलं विश्लेषण जनतेसमोर मांडावं असं असताना पेट्रोलियम मंत्री थंडीमुळे वाढल्याचं सांगत आहेत,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.

 

News English Summary: The manner in which the Modi government at the Center has set a record of raising inflation has made life difficult for the common man. There is opposition across the country on behalf of the Congress. Afterwards, the Petroleum Minister blamed the cold for the rise in prices. We are opposing the Modi government’s attempt to ridicule the people in this manner, ”said Nana Patole while interacting with the media.

News English Title: Maharashtra Congress agitation in state assembly against Fuel price hike news updates.

हॅशटॅग्स

#Congress(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x