23 September 2021 4:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

कोरोना लस घेतानाही निवडणूक मार्केटिंग? | आसामी गमचा, पुदुचेरी केरळच्या नर्स

PM Narendra Modi, Corona vaccine, Delhi

नवी दिल्ली, ०१ मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशामधील तिसऱ्या टप्प्यातील करोना लसीकरण सुरु झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोरनाची लस घेतली. मोदींनी सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील फोटो पोस्ट केल्यानंतर त्याबद्दलची माहिती समोर आली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नरेंद्र मोदी हे कोणतीही कृती ही जाणीवपूर्वक मार्केटिंगच्या हेतूने आणि भविष्यातील राजकीय गरजांप्रमाणे करतात हा इतिहास राहिला आहे. कोणत्या विषयात ते मार्केटिंग आणि प्रोमोशनचा हेतू सध्या करतील याची खात्री देता येणार नाही. तसाच प्रकार त्यांनी पुन्हा कोरोनाची लस घेताना केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळ्यात आसामी पद्धतीचा गमचा घातला होता. हा गमचा म्हणजे आसाममधील महिलांच्या आशीर्वादाचे प्रतिक मानला जातो. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या नर्सेसकडून कोरोना लस टोचण्यात आली त्यांचीही बरीच चर्चा सुरु आहे. यापैकी पी. निवेदा या पुदुचेरीच्या आहेत. तर दुसरी नर्स ही केरळमधील होती. या नर्सेसनी मोदींना लस टोचून काहीवेळ त्यांच्यावर देखरेख ठेवली. त्यामुळे यावेळी देखील निवडणूक हेतू साधला का अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi took the corona vaccine in Delhi this morning after the start of the third phase of corona vaccination in the country. Modi took the first dose of the vaccine at the All India Institute of Medical Sciences (AIIMS) hospital in Delhi at 7 am. The information came to light after Modi posted the photo on Twitter.

News English Title: PM Narendra Modi took the corona vaccine in Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1650)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x