27 July 2024 7:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

त्यापेक्षा भाजपने पंतप्रधानांचं नाव बदलून वाजपेयी करावं, तरच मतं मिळतील: केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्लीच्या प्रसिद्ध रामलीला मैदानाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणं देण्याचा प्रस्ताव उत्तर दिल्ली महापालिकेच्या काही नगरसेवकांनी दिल्यामुळे भाजप विरोधात आता आवाज उठण्यास सुरुवात झाली आहे. त्यालाच अनुसरून आप’चे संयोजक तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप तसेच मोदींना खोचक टोला लगावला आहे.

रामलीला मैदानाचे नामकरण अटलबिहारी वाजपेयी करण्याच्या मुद्याला हात घालून केजरीवाल यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये केजरीवाल यांनी टोला लगावला आहे की, ‘रामलीला मैदान वगरेंच नाव बदलून त्याला अटलजींचे नाव दिल्याने मतं मिळणार नाहीत. त्यासाठी भारतीय जनता पार्टीला पंतप्रधानांचं नाव बदलावं लागेल. तेव्हा कुठे भाजपला मतं मिळतील. कारण मोदींच्या नावाने तर लोकं मतं देत नाहीत’ असं ट्विट करून भाजपला तसेच मोदींना जोरदार टोला लगावला आहे.

केजरीवालांच्या प्रतिक्रयेवर भाजपने उत्तर दिल आहे. त्यात त्यांनी ‘हा केजरीवाल आणि आप पार्टीने केलेला खोटा प्रचार असून भगवान राम आमच्यासाठी आराध्य दैवत असल्याने रामलीला मैदानाचे नाव बदलण्याचा प्रश्नच नाही असं म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x