मधुबनी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मे महिन्याच्या ११ तारखेला नेपाळ मध्ये हिरवा झेंडा दाखवत सुरु केलेली जनकपूर ते अयोध्या बससेवा अखेर मार्केटिंगचा दिखावा ठरल्याचे समोर आलं आहे. मोदींच्या अनेक योजना या कालांतराने केवळ प्रोमोशनच माध्यम असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे. त्यात अजून एका योजनेची भर पडली आहे. जनकपूर ते अयोध्या प्रवासात वापरायच्या बसेस काठमांडूमध्ये धुळ खात पडल्या आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बस सेवेला ज्या दिवशी हिरवा झेंडा दाखवला होता केवळ त्या दिवशी या बस पहिल्या आणि शेवटच्या धावल्याचं उघड झालं आहे. त्यामागील कारण म्हणजे दोन्ही देशादरम्यान होणाऱ्या या प्रवासाला कोणताही कायद्याचा आधार देण्यात आला नव्हता, असं वृत्त आहे. एका खाजगी वृत्तसंस्थेने केलेल्या पडताळणीत हे सत्य समोर आलं आहे. दरम्यान, नेपाळ आणि भारतातील अधिकाऱ्यांना सुद्धा याची कल्पना होती, तरी त्या नरेंद्र मोदींच्या हस्ते रवाना करण्यात आल्या होत्या.
सर्वात महत्वाचं म्हणजे त्या रवाना करण्यात आलेल्या बस मध्ये प्रवासी म्हणून नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांच्या परिचयाच्या लोकांना जमा करून सर्व खबरदारी घेण्यात आली होती. उदघाटनाच्या आदल्या दिवशी त्यांना फोनवर कल्पना देऊन त्यांना अयोध्येला जायचे आहे आणि तुमची राहण्याची-जेवणाची सोय मोफत करण्यात आली आहे असं आमिष देण्यात आलं होत असं वृत्त आहे.
दरम्यान, दोन देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडलेला हा कार्यक्रम कोणत्याही देशांतर्गत कराराविना पार पडला होता आणि बसेस नेपाळहून भारतात पाठविण्यात आल्या होत्या, हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांना प्रसार माध्यमांनी विचारणा केली होती, परंतु महिन्याभरात सुरु होईल असं उत्तर देण्यात आलं होत परंतु ४ महिन्यानंतर बसेस धूळ खात पडल्या आहेत. अयोध्या ते जनकपूर मार्गावर धावणाऱ्या बसेसच अघोषित कॉन्ट्रॅक्ट गंगोत्री ट्रॅव्हल्सकडे देण्यात आलं होत.
व्हिडिओ : नेमका काय झाला होता कार्यक्रम?
