25 July 2021 11:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

वायुदलाकडून अभिनंदन, HAL च्या अचाट कामांची क्षमता बघा! मग रिलायन्स डिफेन्सला ऑफसेट कंत्राट का दिले?

नवी दिल्ली : HAL अर्थात भारतीय संरक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड” कंपनी जीच्या क्षमतेवर समाज माध्यमांवर नकारात्मक गोष्टी फसविण्यास सुरुवात झाली आणि मेक इन इंडिया, संरक्षण क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक तसेच ऑफसेट नियमांच्या आडून रिलायन्स डिफेन्स लिमिटेड बाबतीत होकारात्मक बातम्या पेरण्यास समाज माध्यमांवर सुरुवात झाली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परंतु या सर्व प्रश्नांना हिंदुस्थान एरोनॉटिक्सने आतापर्यंतची सर्वोच्च उलाढाल आणि क्षमतेची आकडेवारी प्रसिद्ध करून चोख उत्तर दिलं आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीने थेट आपल्या उत्पन्नाची क्षमतेची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, २०१७-१८ या आर्थिक वर्षात कंपनीने आजपर्यंतची सर्वोच्च म्हणजे १८,२८,३८६ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. त्याआधीच्या २०१६-१७ या वर्षात कंपनीने १७,६०,३७९ लाख रुपयांची उलाढाल केली होती.

कंपनीने तब्बल ४० विमाने आणि हॅलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. यामध्ये सुपरसॉनिक लढाऊ विमान सुखोई-३०, एलसीए तेजस, डॉर्नियर विमाने तसेच एएलएच ध्रुव आणि चीतल हॅलिकॉप्टरचा समावेश आहे. त्याशिवाय १०५ नव्या इंजिनांचे उत्पादन केले. २२० विमाने/हेलिकॉप्टर आणि ५५० इंजिन्सची दुरुस्ती केली. महत्वाच्या अवकाश कार्यक्रमासाठी १४६ एअरो स्ट्रक्चरचे उत्पादन केले.

एचएएलने शेअर होल्डर्सच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही केलेल्या कामांची आकडेवारी जाहीर केली. फ्रान्सच्या राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात एचएएल’सारख्या अनुभवी कंपनीला दुर्लक्षित करून अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्सला झुकते माप देण्यात आले आहे असा आरोप मोदी सरकारवर करण्यात आला आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेडला ऑफसेट कंत्राट का दिले ? असा प्रश्न काँग्रेसने मोदी सरकारला या आधीच विचारला आहे. एचएएलचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर माधवन यांनी कंपनीच्या २०१७-१८ वर्षातील दमदार कामगिरीची माहिती देतानाच भविष्यातील योजनांची माहिती उपस्थितांना करून दिली. या सरकारी कंपनीला २०१७-१८ मध्ये कर लावण्याआधी ३,३२,२८४ लाख रुपये नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात ३,५८,२८४ लाख रुपये नफा झाला होता. तसेच कर वजा करता शुद्ध नफा २,०७,०४१ लाख रुपये झाला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1609)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x