8 December 2021 6:49 PM
अँप डाउनलोड

संघाच्या सर्व्हेनुसार भाजपला कर्नाटकात धक्का

बंगळुरु : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही दिवसांपूर्वीच कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर एक सर्वे केला होता. त्या सर्वेनुसार भाजपाच्या हाती कर्नाटकाची सत्ता येणार नसल्याचे समोर आलं आहे.

अर्थातच हा सर्वे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच करण्यात आला होता. त्या सर्व्हेत नकारात्मक गोष्टी समोर आल्याने नरेंद्र मोदींच्या रेकॉर्डब्रेक सभा घेण्याचे निश्चित झाले होते.

प्रचार सुरु होण्यापूर्वी संघाच्या सर्वेनुसार भाजपच्या हाती जास्तीत जास्त ७५ जागा मिळू शकतात असं समोर आलं होत. त्यानंतर भाजपने सर्व शक्ती पणाला लावून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जास्तीत जास्त सभा घेऊन आणि देशातील भाजपच्या सर्वच मुख्यमंत्री, मंत्री आणि कार्यकर्त्यांची फौज कर्नाटकाच्या प्रचारात गुंतवून टाकली आणि शेवटच्या १०-१५ दिवसात संपूर्ण कर्नाटकात प्रचाराचा जोरदार धुरळा उडवून टाकला.

संघाच्या सर्वेनुसारच भाजपने प्रचारात हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. नरेंद्र मोदी हे लंडन दौऱ्यावरून येताच कर्नाटकच्या प्रचारात सहभागी झाले होते. या सभा किती फलदायी ठरल्या ते १५ तारखेलाच सिद्ध होईल.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1657)BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x