30 November 2023 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर्समधील तेजी कायम राहणार का? तपशील जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर शेअरने 5 दिवसांत दिला 22 टक्के परतावा, पैसा वेगात वाढतोय Gold Rate Today | अरे देवा! आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा दर किती महाग होणार? Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करतोय, 10 महिन्यांत दिला 150% परतावा, शेअरची किंमत उच्चांकी पातळीवर Aster DM Share Price | 1 दिवसात 20 टक्के परतावा देणाऱ्या एस्टर डीएम हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नेमकं कारण काय? OK Play Share Price | मल्टिबॅगर शेअर! ओके प्ले इंडिया शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील सेव्ह करा 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! पगारात होणार मोठी वाढ, आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाचे अपडेट
x

कन्टोनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन, पण ८ जूननंतरची योजना काय?

India, Lockdown Extended

मुंबई, ३० मे: लॉकडाउन ५.० संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. लॉकडाउन आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.

येत्या महिन्याभरासाठी कन्टेमेंट झोनमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला असून १ जूनपासून लॉकडाऊन ५ सुरू होणार आहे, तर त्याचा कालावधी ३० जूनपर्यंत असणार आहे. तर, कंटेन्मेंट झोन्सव्यतिरिक्त इतर ठिकाणी व्यवहार सुरू होणार आहेत.

दरम्यान, राज्यातील शाळा, कॉलेज सुरू करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात राज्य सरकार यावर निर्णय घेणार आहे. तर, हॉटेल, धार्मिक स्थळं, शॉपिंग मॉल आणि रेस्टॉरन्ट ८ जूनपासून अटीशर्थीसह सुरू करण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे प्रवास बंदीही उठवण्यात आली असून, पास व्यतिरिक्तही राज्याबाहेर प्रवास करू शकणार आहेत. तसेच, रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

काय बंद राहणार?
आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंद राहणार आहेत.
मेट्रोही सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत मेट्रो बंद राहील अशी घोषणा दिल्ली मेट्रोनेही केली आहे.
सिनेमागृह, जीम, स्विमिंग पूल, मनोरंजक पार्क, नाट्यगृह, राजकीय, सामाजिक, सांस्कृति, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी राहणार आहे.

कंन्टेन्मेंटमध्ये काय आहेत नियम?
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या नियमांनुसार जिल्हाधिकारी आपआपल्या जिल्ह्यात नियम जारी करू शकतील. कन्टेन्मेंट झोन्समध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहे. या झोनमधील नागरिक इतर ठिकाणी प्रवास करू शकणार नाहीत. तर, या झोनमध्ये ट्रेसिंग आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

 

News English Summary: An important announcement has been made by the Central Government regarding Lockdown 5.0. The Union Home Ministry has issued new guidelines regarding lockdown. Lockdown will now be limited to the content zone only. Gradually all financial transactions will begin.

News English Title: Mha Issues Guidelines For Covid19 Management News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x