19 October 2021 8:13 AM
अँप डाउनलोड

तिरुपती येथे अमित शहांच्या ताफ्यावर टीडीपी कार्यकर्त्यांची दगडफेक

तिरुपती : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या अमित शहांच्या ताफ्यावर ‘टीडीपी’च्या कार्यकर्त्यांनी तुफान दगड फेक करत ‘अमित शहा गो बॅक’चे नारे दिल्याचे वृत्त आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी चंद्राबाबू नायडूंना दिले होते. परंतु ते पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने चंद्राबाबूंचा टीडीपी पक्ष एनडीए मधून बाहेर पडला होता. त्यांचा राग टीडीपी कार्यकर्त्यांच्या मनात धुसपूसत होता. आज भाजप अध्यक्ष अमित शहा तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी आले असता त्यांना टीडीपी कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अमित शहा तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन रेनीगुंटा विमानतळाच्या दिशेने जात असताना टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी ताफ्यावर दगडफेक केली.

अमित शहा दर्शन घेऊन बाहेर येताच टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी ‘अमित शहा गो बॅक’चे नारे देत, त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यात त्यांच्या ताफ्यातील एका गाडीच्या काचा फुटल्या आहेत. परंतु अमित शहा यांच्या गाडीच कोणतीही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. एकूणच कर्नाटक नंतर आंध्र प्रदेशाच्या विधानसभा निवडणूक जवळ येत आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्यावरून आंध्र प्रदेशच राजकारण आता पासूनच तापायला सुरुवात झाली आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x