25 April 2024 9:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

VIDEO | जवानांच्या मृत्यूवर आनंद | आता रिपब्लिकला राष्ट्रविरोधी म्हणत हाकलण्यास सुरुवात

Congress leader Mani Shankar Aiyar, Republic TV, anti national channel

नवी दिल्ली, १७ जानेवारी: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर आलं आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे पुलवामा हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते तेव्हा देश हळहळला होता. मात्र अर्णब अत्यंत खुश झाला होता हे त्यांच्या चॅट वरून सिद्ध होतंय. 14 फेब्रुवारी 2019 च्या एका चॅटमध्ये गोस्वामी म्हणतात “हा हल्ला आम्ही वेड्याप्रमाणे जिंकला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तब्बल 40 जवान शहीद झाले होते, त्याच दिवशी हा संवाद झाल्याने अर्णब गोस्वामी किती भीषण माणूस आहे याचा प्रत्यय आला आहे.

विशेष म्हणजे त्यानंतर बालाकोट स्ट्राईकच्या तीन दिवस आधीच अर्नबला त्याची माहिती असल्याचं चॅट मध्ये दिसतंय. देशाच्या सिक्रेट लष्करी कारवाईबद्दल त्याला माहिती कशी प्राप्त झाली आणि त्याचा थेट संबंध पीएमओ’शी जोडला जाऊ लागल्याने मोदींनी पायउतार व्हावं अशी मागणी समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. मात्र यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी केलेल्या धक्कादायक आरोपाला दुजोरा मिळाला आहे. कारण देशाच्या सिक्रेट लष्करी कारवाईबद्दल एकतर स्वतः लष्कर, पीएमओला आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना माहिती असते. मात्र तीच माहिती अर्णब गोस्वामींकडे कुठून आली. त्यातही पुलवामा हल्ला होताच देशभर दुःख व्यक्त होतं असताना अर्णब गोस्वामी आनंदी असल्याचं त्यांच्या चॅटमध्ये समोर आलं आहे.

त्यानंतर देशभर रिपब्लिक विरुद्ध संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळालं. समाज माध्यमांवर कालपासून रिपब्लीकला राष्ट्रद्रोही म्हटलं जात असताना आता राजकीय नेते देखील त्यांना राष्ट्रदोही म्हणून हाकलून देत आहेत. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर एका हॉटेलमध्ये लंच करण्यास बसलेले असताना रिपब्लिकचे रिपोर्ट त्यांचा बाईट घेण्यासाठी गेले असता मणिशंकर अय्यर यांनी त्यांना राष्ट्रविरोधी म्हणत थेट हाकलून देत मला जेऊ द्या असं म्हटल्याचे दिसतं आहे.

 

News English Summary: There was an atmosphere of anger against the Republic all over the country. While the Republic has long been called a traitor on social media, political leaders are now dismissing it as a traitor. While Congress leader Mani Shankar Aiyar was having lunch at a hotel, Republican’s report went to take his bite.

News English Title: Congress leader Mani Shankar Aiyar called Republic TV anti national channel news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x