14 December 2024 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

राज्यांशी चर्चा न करताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटले | पवारांचं टीकास्त्र

Modi Govt, bulldozed farm laws, Sharad Pawar

नवी दिल्ली, २९ डिसेंबर: नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा ३४वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी इतके दिवस मुक्काम ठोकला आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. उद्या ३० डिसेंबरला पुन्हा एकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंदोलक शेतकऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे.

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. उद्या चर्चेची ७वी फेरी पार पडणार आहे. तर कायदे मागे घेण्याविषयी आणि स्वामिनाथ आयोगाच्या अहवालावरच चर्चा केली जाईल, असं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. उद्या होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंदोलन शेतकऱ्यांनी आज शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली. “३० डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत जर कोणताही तोडगा निघाला नाही. तर सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावून, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊ, अशी हमी शरद पवार यांनी दिल्याचं शेतकरी नेत्यांनी बैठकीनंतर सांगितलं.

दरम्यान, आज पुन्हा याच विषयाला अनुसरून पवारांनी मोदी सरकारला लक्ष केलं आहे. देशातील राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही”, असा टोला शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावला आहे. ते पीटीआयशी बोलत होते.

 

News English Summary: Today again, following the same issue, Pawar has paid attention to the Modi government. Without any discussion with the states of the country or knowing their views, the central government retweeted the agricultural laws. It is not possible to sit in Delhi and do farming “, said Sharad Pawar to the Modi government. He was talking to PTI.

News English Title: Modi Govt bulldozed farm laws without consulting states said Sharad Pawar to PTI news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x