3 February 2023 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर शेअर, 9 महिन्यांत 200% परतावा, शेअर खरेदी करावा का? Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल Numerology Horoscope | 04 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Income Tax Slab 2023 | वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे का? नव्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 5 पट टॅक्स भरावा लागणार Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण? Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा RACL Geartech Share Price | जबरदस्त शेअर! 1051 टक्के परतावा देणारा शेअर ऑल टाईम फेव्हरेट, कारण काय?
x

एक 'सोंगाड्या' आहे जो सकाळी भगवा आणि दुपारी हिरवा असतो, मनसेच्या गजानन काळेंचा धार्मिक टोला कोणाला?

MNS leader Gajanan Kale

Sushma Andhare | शिवसेनेच्या सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर मनसे प्रवक्त्याने टीका केली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचं नाव न घेता टीका केली आहे. महाराष्ट्रात वांद्रे मातोश्री येथे असा एक “सोंगाड्या” आहे जो सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो… तरी बाईला कोण कधी उठतो व कधी झोपतो याचं जास्त पडलेलं, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.

वक्तृत्व स्पर्धेत टाळया आणि बक्षीसं मिळावीत म्हणून मनी म्याव कायम भाषणं करत आली आणि त्याच सवयीचा गुलाम झाल्यामुळे वेडेवाकडे चाळे करत आता राजकारणात टिकू पाहतेय, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे. उष्माघाताने राहिलेली शिल्लकसेना पण जिवंत राहते की नाही या चिंतेत मातोश्रीवरचा “सोंगाड्या”आणि सैनिक असल्याचं कळतंय, अशी बोचरी टीकाही गजानन काळे यांनी केली आहे. मात्र सुषमा अंधारे यांनी मनसेचे दोन्ही प्रवक्ते म्हणजे गजानन काळे आणि संदीप देशपांडे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की या असल्या चंगू-मंगूना मी जास्त महत्व देतं नाही असं सांगत खिल्ली उडवली.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना देखील टोला लगावला. त्या भंडाऱ्यात बोलत होत्या. राज्यातील शिंदे,फडणीस सरकार जानेवारी महिन्यात कोसळणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

मोदींचा करिष्मा ओसरला
मोदींचा करिष्मा त्यांच्या गुजरातमधून ओ’सरला आहे. भारतीय जनता पक्षाने रवींद्र जडेजा यांच्या पत्नीला गुजरातमधून तिकीट दिले आहे. मात्र गुजरातमध्ये मोदींचा करिष्मा ओसरल्यानं जडेजा यांना बाळासाहेबांच्या जुन्या व्हिडिओचा सहारा घ्यावा लागला असून, तो व्हिडीओ व्हायरल करून मत मागण्याचा प्रसंग भारतीय जनता पक्षावर ओढवल्याचा घणाघात अंधारे यांनी केला आहे.

आमदार राजू पाटलांवर निशाणा
यावेळी त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना देखील टोला लगावला आहे. त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या आरोपाचा खरपूस समाचार घेताना आहे. भेकड लोकांवर मी काय बोलणार, ते माझ्या पाठीमागून बोलतात. मी तर, सर्वांसमोर उत्तर देते, असं अंधारे यांनी म्हटलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS leader Gajanan Kale reply to Sushma Andhare and MP Sanjay Raut check details on 03 December 2022.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x