सावधान | कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी येत आहेत फेक कॉल
नवी दिल्ली, २९ डिसेंबर: कोरोना आपत्तीवर उपाय म्हून लसीकरणाची तयारी वेगाने सुरू आहे. जानेवारी महिन्यात कोणत्या कंपनीच्या लसचा वापर लसीकरणासाठी करायचा हा निर्णय होण्याची शक्यता आहे. या अशा वातावरणात कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी फोन आला तर लगेच सावध व्हा. सायबर क्षेत्रातले भामटे फोन करुन तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात, असा सावधगिरीचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. (Covid vaccine fake registration call or web link on mobile)
केंद्र सरकारने अद्याप कोविड लसीकरणासाठी नोंदणी सुरू केलेली नाही. लस संदर्भातलाच निर्णय झालेला नसल्यामुळे नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही. मात्र सायबर क्षेत्रातले भामटे दिशाभूल करणारी माहिती सांगून नागरिकांचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र काही भामटे फोन करतात तुमची प्राथमिक माहिती घेतात आणि काही सेकंदांनंतर नोंदणी झाल्यामुळे आलेला ओटीपी सांगा अशी मागणी करतात. आपण लसीकरणाच्या नोंदणीची प्रक्रिया समजून ओटीपी दिला तर आपल्या बँक खात्यातून आर्थिक व्यवहार करण्याचे डिजिटल अधिकार भामट्यांच्या हाती जातात. यामुळे आपणच आपल्या चुकीमुळे बँक खात्यातील मोठी रक्कम गमावून बसतो.
दरम्यान, ब्रिटनसह युरोपच्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नव्या प्रकारचा विषाणू आढळून आला आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन (बदल) होऊन तयार झालेला हा नवा विषाणू आणखी घातक असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी या विषाणुला B.1.1.7 असे नाव दिले आहे. कोरोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनमुळे जगभरातील अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. त्यातही प्रामुख्याने ब्रिटनमधून लोकांची ये-जा सुरु असलेले देश अधिक चिंतेत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूची नवी प्रजाती अद्याप भारतात कुठेही आढळलेली नाही, अशी माहिती निती आयोगाच्या आरोग्य विभागाने नुकतीच दिली आहे. त्यातच देशाची चिंता थोडी कमी करणारी एक बातमी समोर आली आहे.
केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के. विजय राघवन यांनी सांगितले की, कोरोनावरील लस ब्रिटनसह दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी ठरेल. कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार आहे. परंतु लस मिळेपर्यंत प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी घ्यायला हवी.
News English Summary: Preparations for vaccination as a solution to the Corona disaster are in full swing. It is likely to be decided in January which company will use the vaccine for vaccination. In such an environment, if you get a call for registration of covid vaccination, be alert immediately. Cyber hackers can harm you financially by making phone calls, the police have warned.
News English Title: Covid vaccine fake registration call or web link on mobile news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News